Petrol Diesel: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील लागू केलेले सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे (Iran America War) आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) विक्रीवर काही निर्बंध लागू केले होते. याशिवाय, या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भावही कडाडले होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची गरज असणारे व्यावसायिक चिंतेत पडले होते. मात्र, आता उद्यापासून केंद्र सरकार सर्व निर्बंध हटवणार आहे. (Petrol and Diesel News)
या निर्णयामुळे वाहतूक, मालवाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक खरेदीदारांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक वापरासाठीचे पेट्रोल आणि डिझेल रिटेल विक्रेत्यांकडून घेण्यावर निर्बंध होते. डिझेल विक्री प्रति ग्राहक 200 लिटरपर्यंतच अशी मर्यादा लागू करण्यात आली होती. 12 जून रोजी हे निर्बंध लावण्यात आले होते. ब्लॅक मार्केटिंग थांबवण्यासाठी तसेच रिटेल वापरासाठीचे इंधन व्यावसायिक वापरासाठी वळवले जाऊ नये, यादृष्टीने हे निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता हे सर्व निर्बंध दूर करण्यात आले आहेत.
New Rules from July: जुलै महिन्यापासून महत्त्वाचे बदल
तुम्ही एलपीजी ई-केवायसी पूर्ण न केल्यास काय होईल?
जर तुम्ही एलपीजी सिलिंडर वापरत असाल, तर ई-केवायसी पूर्ण करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. सरकारच्या मते, अंतिम मुदतीपर्यंत पडताळणी पूर्ण न केल्यास तुमचे अनुदान कायमचे गमावले जाऊ शकते. हा नियम विशेषतः प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. जे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी नाहीत, परंतु अनुदान घेत आहेत, त्यांनी आपली माहिती वेळेवर अद्ययावत करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गॅस एजन्सी किंवा मोबाईल ॲपद्वारे सहजपणे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करू शकता.
आयटीआर (ITR) साठी महत्त्वाचे अपडेट्स
आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2026 आहे, परंतु करदात्यांसाठी 30 जून ही तारीख देखील महत्त्वाची आहे. या तारखेपर्यंत विवरणपत्रात काही विसंगती आढळल्यास आयकर विभाग छाननी नोटीस (scrutiny notice) जारी करू शकतो. याव्यतिरिक्त, फॉर्म 26 एएस (Form 26AS), एआयएस (AIS) किंवा बँक रेकॉर्डमधील कोणत्याही विसंगतीमुळे चौकशी होऊ शकते. त्यामुळे, भविष्यात कोणतीही अडचण टाळण्यासाठी आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे.
30 जून 2026 ही तारीख व्यावसायिकांसोबतच नोकरदारांसाठीही महत्त्वाची
30 जून 2026 ही तारीख व्यावसायिकां सोबतच नोकरदार लोकांसाठी देखील महत्त्वाची आहे. कारण 30 जून 2026 ही आर्थिक बाबींसंदर्भात आणि कर संदर्भात अनेक कामं पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. 1 जुलै 2026 पासून नवे नियम लागू होणार आहेत. जर तुम्ही 30 जून 2026 पर्यंत तुमची पेंडिग कामं पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला त्यामुळे आर्थिक दंड होण्याची तसेच तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 30 जूनच्या आतच म्हणजे या दोन दिवसात आयकर विवरणपत्र दाखल करणं गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही एलपीजी सिलिंडर वापरत असाल, तर ई-केवायसी पूर्ण करणे हे एक महत्त्वाचे काम आहे.
आणखी वाचा
सोने-चांदी पुन्हा स्वस्त; एका दिवसात किती दर घसरले? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!