July 2026 Monthly Horoscope: कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जुलै महिना थोडा सांभाळून! पैसा, नोकरी, प्रेमात ‘असे’ बदल, काय काळजी घ्याल? मासिक राशीभविष्य


July 2026 Monthly Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, उद्यापासून (June 2026) जुलै महिना सुरू होत आहे. हा महिना कसा जाणार? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिना हा ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे. आर्थिक, करिअर आणि वैवाहिक जीवनाबाबत जुलै महिना नेमका कसा असेल? यासाठी कर्क, सिंह, कन्या अशा 3 राशींचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत. 

कर्क रास (Cancer July 2026 Monthly Horoscope)

लव्ह लाईफ:  कर्क राशीसाठी जुलै महिन्यात कुटुंब आणि जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळेल. नात्यातील विश्वास वाढेल. विवाह इच्छुकांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात.

करिअर: करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांकडून नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात विस्ताराची शक्यता आहे.

आर्थिक: खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. घराशी संबंधित खर्च होऊ शकतो, पण आर्थिक अडचण जाणवणार नाही.

आरोग्य: मानसिक ताण टाळा. पुरेशी झोप आणि संतुलित आहारावर भर द्या.

सिंह रास –  (Leo July 2026 Monthly Horoscope)

प्रेम जीवन: राग आणि अहंकारामुळे छोट्या गोष्टींचे मोठे वाद होऊ शकतात. शांतपणे संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत होईल.

करिअर: कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल, मात्र तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल. व्यवसायात सावधगिरीने निर्णय घ्या.

आर्थिक: आर्थिकदृष्ट्या हा महिना लाभदायक राहील. मोठ्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित खर्च वाढू शकतो.

आरोग्य: थकवा, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. विश्रांती घ्या.

कन्या रास – (Virgo June 2026 Monthly Horoscope)

प्रेम जीवन: प्रेमसंबंधात स्थैर्य आणि विश्वास वाढेल. विवाहितांना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. अविवाहितांसाठी शुभ काळ आहे.

करिअर: नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण कराल. व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभ होईल.

आर्थिक: आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.

आरोग्य: नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा :

July 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी जुलै महिना नशीब पालटणारा! पैसा, नोकरीत मोठ्ठी संधी, धनलाभाचे योग, मासिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *