प्रसिद्ध नेमबाज, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले प्रशिक्षक दिवंगत जसपाल राणा यांच्या आई श्यामा देवी यांचं रविवारी निधन झालं. त्यांवी वयाच्या 78 व्या वर्षी दिल्लीच्या आरआर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने राणा कुटुंबाने दुसरा मोठा धक्का बसला आहे.
नेमबाज जसपाल राणा यांचं 12 जून रोजी निधन झालं. आता त्यांच्या आईने जगाचा निरोप घेतला आहे. श्यामा देवीच्या जाण्याने राणा कुटुंबारा दुहेरी धक्का बसला आहे. मुलगा जसपाल राणा यांच्या वाढदिवस म्हणजे 28 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोस्ट करत म्हटलं की, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. राणा कुटुंबीयांना या दु:खातून बाहेर पडण्याचं बळ मिळो’. राणा कुटुंबावर दुहेरी धक्का बसल्याने क्रीडा क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://x.com/pushkardhami/status/2071283890019578155
प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा यांनी 12 जून रोजी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच हृदयविकारामुळे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झालं. जर्मनीतील म्यूनिक येथे झालेल्या आयएसएसएप विश्वचषक स्पर्धेतून भारतात परतत असताना ते विमानाच आजारी पडले. पुढे नवी दिल्लीला पोहोचताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जसपाल राणा यांची प्रकृती खूपच बिघडली होती. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले होते. परंतु डॉक्टरांना जसपाल राणा यांचा जीव वाचवण्यास अपयश आलं.
जसपाल राणा यांच्या जाण्याने क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का बसला होता. अनेकांनी जसपाल राणा यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने देखील जसपाल राणा यांना आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली होती. जसपाला राणा यांच्या अंत्यविधीला मनु भाकरला अश्रूही अनावर झाले होते.