Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  


Ketan Agrawal Death Case पुणे : राज्यभरात केतन अग्रवाल खून प्रकरण चर्चेत आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आज सकाळी सिया गोयल हिला लोहगडाव नेत खून प्रकरणाचं नाट्य रुपातंर घडवून आणलं. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते, त्यासाठी सिया गोयलला पुण्यातून विमानतळापर्यंत सोडणाऱ्या वाहनाचा चालक समोर आला आहे. वैभव जाधव नावाच्या चालकानं सिया गोयल संदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे.  

बालीला जाताना गाडीत काय-काय घडलं, चालकाने सर्व घटनाक्रम सांगितला

सिया आणि केतन अग्रवाल हे प्री – वेडिंग शूट साठी बालीला जाणार होते, यासाठी त्यांनी पुण्यातून एक गाडी बुक केली होती. याच गाडीचा चालक वैभव जाधव यानं त्या दिवशी काय घडलं ते सांगितलं आहे. बालीला जाण्यासाठी सिया तयार नव्हती. ती गाडीत सुद्धा बसायला तयार नव्हती म्हणून सियाचा भाऊ साहिल याने तिला हाताला धरून जबरदस्ती गाडीत बसवले. यावर सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्यात पुणे ते रावेत ( पिंपरी चिंचवड) दरम्यान गाडीमध्ये वाद झाले होते, असं वैभव जाधव यानं म्हटलं. 

वैभव जाधव म्हणाला की पुढे तो त्या दिवशी किवळे लोढा येथून केतन अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना घेऊन मुंबई च्या दिशेने रवाना झाला. यानंतर ते एका फूड कोर्टवर ते चहा नाष्टा करण्यासाठी थांबले होते.  तेव्हा सिया कशाच्या तरी बहाण्याने पुन्हा गाडी कडे आली गाडीतून काही सामान काढून तिनं खिशात ठेवले. ही बाब गाडीचा ड्रायव्हर म्हणून माझ्या निदर्शनास आली होती. यासंदर्भातील आणखी माहितीनुसार पुढं जेव्हा ड्रायव्हरने सर्वांना मुंबई एअरपोर्टवर सोडले तेव्हा काही वेळात केतनचा ड्रायव्हर ला फोन आला की माझं काही सामान गाडीमध्ये राहिलं आहे. माझा पासपोर्ट राहिला असं केतन अग्रवाल म्हणाला. दरम्यान सियाने केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला होता ही बाब संबंधित गाडीचा ड्रायव्हर वैभव जाधवच्या निदर्शनास आली होती, हे आता समोर आलं आहे.  

दरम्यान, लोहगडावर झालेल्या रिक्रेएशननंतर सिया गोयल आणि चेतन चौधरीची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या समोर चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोन तासांपेक्षा अधिक काळ चेतन आणि सियाची पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या समोर चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *