France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला


France Plane Crash : जगात गेल्या काही दिवसांपासून विमान अपघात आणि हेलिकॉप्टर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. आज फ्रान्सच्या टॉम्ब्लेन शहरात विमान कोसळलं . तर, सौदी अरेबियात एक हेलिकॉप्टर कोसळलं. फ्रान्समधील विमान अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सौदी अरेबियातील हेलिकॉप्टर अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 

फ्रान्समध्ये विमान अपघातात 11 जणांचा मृत्यू

फ्रान्सच्या ईशान्य भागातील टॉम्ब्लेन शहरात विमान कोसळल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला. अपघात झालेलं विमान पिलाटस पीसी -6  पोर्टर होतं. अपघातग्रस्त विमान एका पॅराशूट ट्रेनिंग स्कूलशी संबंधित होतं . याचा वापर पॅराशूट जंपिंग ट्रेनिंगसाठी केला जात होता. अपघातात पायलटसोबत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 विद्यार्थी आणि 5 प्रशिक्षकांचा समावेश आहे. विमानातील कोणीही या अपघातात जीव वाचवू शकलं नाही. 

विमानाचं उड्डाण होत असतानाच ते दुर्घटनाग्रस्त झालं, मदतकार्य करण्यासाठी पथकं घटनास्थळी पोहोचली मात्र कोणालाही वाचवता आलं नाही. फ्रान्सच्या गृहमंत्रालयाकडून देखील याघटनेवर लक्ष ठेवलं जात आहे. 

11 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला विमान अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप समोर आलं नाही. तपास यंत्रणांकडून विमानातील तांत्रिक अडचणी, वातावरण किंवा इतर कारणामुळं  विमान कोसळलं का हे तपासलं जातं आहे. मात्र, ब्लॅक बॉक्स तपासणीनंतरच या अपघाताचं कारण समोर येईल. 

सौदी अरेबियात हेलिकॉप्टर कोसळून 14 जणांचा मृत्यू

सौदी अरेबियातील रास तनुरा भागात हेलिकॉप्टर कोसळलं. पेट्रोलियम रिफायनरी अरामकोचं हेलिकॉप्टर कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.  अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  सौदी अरेबियातील सरकारी माध्यम सौदी प्रेस एजन्सीच्या रिपोर्टनुसार स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी 6 वाजता हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत व्यक्ती सौदी अरेबियाचे होते. हेलिकॉप्टर अपघाताच्या  कारणांचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

सौदी अरेबियातील रास तनुरा येथील रिफायनरी अमेरिका आणि इराण युद्धामुळं बंद होती. ती रिफायनरी 25 जूनपासून पुन्हा सुरु करण्यात आली होती. तिथून कच्चा तेलाचा पुरवठा सुरु झाला होता. मात्र, तीन दिवसात तिथं हेलिकॉप्टर कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेदेखील वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *