Lapata Ladies Fame Actor Video: ‘हॉटेलमध्ये परत दिसलास तर ..’;’लापता लेडीज’ फेम अभिनेत्याला दिग्दर्शकाकडून जीवे मारण्याची धमकी, मारहाणही केली? अभिनेत्याचा रडत रडत video


Satendra Soni:‘लापता लेडीज’ आणि ‘मिर्झापूर’मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Satyendra Soni) याने मध्य प्रदेशात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान थकीत मानधनावरून झालेल्या वादानंतर एका दिग्दर्शकावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत सतेंद्रने सांगितलं की, शूटिंगचे आठ दिवस पूर्ण करूनही त्याला उर्वरित पैसे देण्यात आले नाहीत. उलट पैसे मागितल्यानंतर त्याला सेट सोडून जाण्यास सांगण्यात आलं. ‘हॉटेलमध्ये पुन्हा दिसू नकोस’ अशा शब्दात त्याला हाकलण्यात आलं.नंतर दिग्दर्शकाकडून त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.दिग्दर्शकाकडून मारहाण झाल्याचा आरोपही अभिनेता सत्येंद्र सोनी याने केला. सध्या मनोरंजनसृष्टीत या प्रकरणाची चर्चा रंगली आहे .

रडत रडत केला video

व्हिडीओमध्ये रडताना सतेंद्र म्हणाला, “माझं नाव सतेंद्र सोनी आहे. मी एक अभिनेता आहे. मी इथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलो होतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह आहेत. त्यांनी मला 50 हजार रुपये साइनिंग अमाउंट दिलं होतं आणि उर्वरित पैसे शूटिंगनंतर देऊ असं सांगितलं होतं. आज शूटिंगचे आठ दिवस पूर्ण झाले आहेत. जेव्हा मी त्यांच्याकडे पैशांबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी मला पॅक-अप करून निघून जाण्यास सांगितलं. तसेच हॉटेलमध्येही दिसू नकोस, अशी धमकी दिली. ते मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत.”यानंतर सतेंद्रने एका पोस्टमध्ये दावा केला की, दिग्दर्शक पुष्पेन्द्र सिंह आणि त्यांची पत्नी प्रगती चौहान यांनी सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर हल्ला केला.

 

त्याने लिहिलं, “आम्ही तिघं चालत होतो. तेव्हा त्यांनी कारमधून आमचा पाठलाग केला. त्यांची पत्नी प्रगती चौहान आणि दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह यांनी मला पाहताच रस्त्याच्या मध्यभागी मारहाण सुरू केली. श्रीधर भैय्या मला वाचवायला पुढे आले, तर दिग्दर्शकांनी त्यांनाही मारहाण केली.” नंतरच्या एका पोस्टमध्ये सतेंद्रने सांगितलं की, तो आणि त्याचे दोन सहकलाकार सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत. रेल्वे स्टेशनवरून व्हिडीओ शेअर करत त्याने मध्य प्रदेश पोलिसांचे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

 

कोण आहे सत्येंद्र सोनी?

सतेंद्र सोनीने याआधी डॉक्टरजी, बवाल, रात अकेली है आणि ‘हॅलो बच्चो’सारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. मात्र लापता लेडीज  मधील ‘छोटू’ या भूमिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली. दरम्यान, सतेंद्र लवकरच मिर्झापूर: द मूवीमध्ये झळकणार असून, या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर करत आहेत. यात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्यांदू आणि जितेंद्र कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *