Last Updated:
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लग्न ठरल्यानंतर सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीसोबत ब्रेक अप केलं होतं, अशी नवी माहिती समोर आली आहे.
18 जून रोजी लोहगडावर केतन अग्रवाल नावाच्या २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनला गडावरून खाली ढकलून दिलं. या घटनेनंतर त्यांनी अपघाताचा बनाव रचला. मात्र त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी केतनच्या मृत्यूचं गूढ समोर आणलं आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. आरोपी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन सध्या पोलीस कोठडीत आहेत. चौकशीत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.
आता चेतन आणि सियाच्या लव्ह स्टोरीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लग्न ठरल्यानंतर सियाने चेतनसोबत ब्रेक अप केलं होतं. मात्र कालांतराने दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढली. या दोघांची जवळीक थेट केतनच्या मृत्यूस कारणीभूत ठरली.
ब्रेकअपमुळे चेतन होता प्रचंड अस्वस्थ
मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांच्यात काही काळापूर्वी ब्रेकअप झालं होतं. सियाने चेतनसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते आणि ती आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली होती. ती आपल्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या तयारीत व्यस्त झाली होती. मात्र, दुसरीकडे चेतन या ब्रेकअपमुळे अत्यंत अस्वस्थ झाला होता. तो सियाला कोणत्याही परिस्थितीत विसरू शकत नव्हता.
अशी झाली जुन्या प्रियकराची पुन्हा एन्ट्री
सियाला विसरणं अशक्य झाल्याने चेतनने तिच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याने सियाशी पुन्हा संपर्क साधला. सुरुवातीला फोनवर बोलणे आणि नंतर व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू झालं. हळूहळू जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि दोघंही पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आले. एका बाजूला सियाच्या घरात तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला सिया आणि चेतनचं प्रेम दुसऱ्यांदा फुलत चाललं होतं.
ब्रेक अप झालेल्या प्रियकराची पुन्हा आयुष्यात एन्ट्री झाल्याने सियाला चेतनशी लग्न करायचं होतं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिचा केतनसोबत साखरपुडा झाला होता. त्यामुळे तिला यातून मागे फिरणं कठीण जात होतं. त्यामुळे सिया आणि चेतनने थेट केतनच्या हत्येचा प्लॅन रचला. तसेच केतन अस्पष्ट बोलायचा, तसेच त्याला विग होता, यामुळेही सियाला हे लग्न करायचं नव्हतं, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
Pune,Maharashtra
रक्तरंजित लव्ह स्टोरी! लग्न ठरल्यावर सियाने चेतनसोबत केला होता ब्रेकअप, एका गोष्टीमुळे पुन्हा जवळीक, थेट खून करण्यापर्यंत कसं गेलं प्रकरण?
