Garud Puran : पुढच्या जन्मात सुंदर चेहरा की कुरुप? महाभारतातही उल्लेख, वाचा गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णाने नेमकं काय म्हटलंय…


Garud Puran : हिंदू धर्माच्या 18 महापुराणांपैकी गरुड पुराण हे महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातील संवादाच्या माध्यमातून आयुष्य, मृत्यू आणि कर्माचं फळ तसेच, मृत्यूच्या नंतरच्या स्थितीबाबत वर्णन करण्यात आलं आहे. 

गरुड पुराणानुसार, व्यक्तीचा पुढचा जन्म त्याचे कर्म, स्वभाव आणि त्याच्या आचरणावर आधारित आहे. व्यक्तीची सुंदरता आणि कुरुपता फक्त बाहेरचं रूप नाही तर मागच्या जन्माचे पुण्य आणि पापाचं परिणामसुद्धा सांगण्यात आलं आहे. 

महाभारतातील श्लोकाचं वर्णन

यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षक:
सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्

याचा अर्थ असा होतो की, पेरावे तसे उगवते. म्हणजेच , जर आपली कर्म चांगली असतील तर आपल्याला चांगलंच फळ मिळेल. याव्यतिरिक्त कर्म आणि पुनर्जन्माशी संबंधित भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, 

कर्मणा जायते जन्तु: कर्मणैव विलीयते

याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीतलावर लोक आपल्या कर्मानेच जन्म घेतात. आणि त्यांच्या कर्मानुसारच त्यांचं भविष्य ठरतं. 

गरुड पुराणात ‘हे’ कर्म सुदरतेचे प्रतीक आहेत 

  • दया आणि सेवा करणे. 
  • खरं बोलणे.
  • आई-वडील आणि गुरुंचा आदर करणे. 
  • स्त्रियांचा आदर करणे.
  • सात्विक आहार आणि शुद्ध आचरणाचे पालन करणे. 

गरुड पुराणानुसार, अशा कर्माने व्यक्तीला पुढच्या जन्मात चांगलं सौंदर्य आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, चांगलं आरोग्य आणि समाजात सन्मान मिळतो. 

तर, छळ, हिंसा, क्रूरता, इतरांचा अपमान करणे, आणि अहंकाराची भावना मनात असेल तर व्यक्तीला पुढच्या जन्मात कुरुपता आणि कष्टाचा सामना करावा लागतो. 

(टीप – गरुड पुराणाता या गोष्टी व्यक्तीला घाबरवण्यासाठी नाही तर नैतिकतेचं पालन करायला शिकवण्यासाठी केल्या जातात. )                                                                                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :         

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना लागणर लॉटरी; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात खेळणार पैसाच पैसा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *