‘गुलाबी साडी’ गाण्यावर रितेश देशमुखचा धडाकेबाज डान्स, Video होतोय प्रचंड व्हायरल – Marathi News | Riteish Deshmukh electrifying dance to the song Gulabi Saree


Video Viral : मराठी संगीतविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेला गायक संजू राठोड याच ‘गुलाबी साडी’ हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याचं आता बॉलिवूडसाठी नव्या अंदाजात पुनर्निर्माण करण्यात आलं असून आगामी ‘धमाल 4’ चित्रपटात हे गाणं झळकणार आहे. विशेष म्हणजे या नव्या आवृत्तीत अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘गुलाबी साडी’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातील प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. सोशल मीडियावर या गाण्यावर हजारो रील्स आणि डान्स व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर ठेका धरत व्हिडिओ शेअर केले होते. आता त्याच गाण्याला हिंदी चित्रपटासाठी ‘साडी’ या नावाने नव्या रूपात सादर करण्यात आले असून, रिलीज होताच त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या नव्या आवृत्तीचं संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार तनिष्क बागची यांनी केलं असून, गीतकार कुमार यांनी नव्या शब्दांमध्ये हे गाणं साकारलं आहे. सध्या या गाण्याचा ऑडिओ ट्रॅक प्रदर्शित झाला असून, 27 जून रोजी त्याचा अधिकृत व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

संजू राठोडने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा टीझर शेअर केला होता. या टीझरमध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, ईशा गुप्ता, अंजली आनंद आणि स्वतः संजू राठोडची झलक पाहायला मिळते. टीझर शेअर करताना संजू राठोडने तुमचा गुलाबी रंग पुन्हा एकदा सोशल मीडिया फीडवर राज्य करण्यासाठी येतोय… तयार रहा! अशा आशयाचं कॅप्शन दिलं होतं.

मराठी गाण्याची लोकप्रियता आता बॉलिवूडपर्यंत पोहोचल्याचं या नव्या आवृत्तीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. ‘धमाल 4’ मधील या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावरही या गाण्याविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, आगामी काळात हे गाणं पुन्हा एकदा ट्रेंडिंग ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *