Uddhav Thackeray : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ; यवतमाळच्या सभेत संजय देशमुखांवर उद्धव ठाकरे कडाडले


Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)  यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. आज ते खासदार संजय देशमुख यांच्या वाशिम-यवतमाळ संघाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी सभा घेतली यावेळी त्यांनी फुटलेल्या खासदारांवर तोफ डागली, त्यांनी सर्वांचा विश्वासघात केल्याचं सांगत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी यावेळी फुटीर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ देखील दाखवला यामध्ये त्यांनी आधी एकदा आईची शपथ घेत मी शिवसेना ठाकरेंसोबत राहणार असल्याचं सांगितलं होतं. संजय देशमुखांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली, आता त्या आईला काय वाटत असेल? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला आहे. (Uddhav Thackeray) 

Uddhav Thackeray :  संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ दाखवला 

फुटीर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ दाखवला त्यामध्ये संजय देशमुख बोलताना म्हणतात की,  जेव्हा हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच एक वाक्य मला आजही आठवते की, मी वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसैनिक झालो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की, जेव्हा कोणी संकटात असेल, तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे, आज शिवसेना संकटात होती, माझी आई 83 वर्षाची होती तिने सुद्धा सांगितल शिवसेनेसाठी आपल्याला जायचं आहे.

आता आईची आठवण आलेली आहे, मला सांगितलं होतं शिवसेनेला सहकार्य कर म्हणून आज म्हणून मी ठाकरेंच्या बरोबर आहे. आईला काय वाटेल, आईची शपथ घेऊन जर एक गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली विशेषतः माझी झाली, आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की, जेव्हा कोणी संकटात अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरी ठाकरे उभा आहे, मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने नऊ खासदार आपल्या हक्काचे मशालीवरती निवडून आणले होते, ती फोडण्याची वेळ का आली असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Uddhav Thackeray :  दोन वर्षांमध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते?

त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदारे मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडवरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींची लाट? आणि विकास निधी, विकास निधी जे काय बोंबलतायत, एकूण दोन वर्षांमध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? असाही सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

Uddhav Thackeray :  नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान…

पावसाळ्याची नुकती सुरुवात होते पावसाळा लांबला होता आणि आपण सगळे ग्रामीण भागातले आहात. अनेक जण इकडे शेतकरी असतील आहेत का रे? तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो कारण तुम्ही तुमची शेतातली काम सोडून इथे आलात आणि पावसाळ्याची आपण वाटच बघत असतो. कारण एकदा का पाऊस पडला की नवीन कोंब फुटतात. तसा हा माझा पावसाळा आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे. अनेक सडलेली पान गेली, तरी परत पाऊस पडतो आणि नवीन कोम उगवतात. ते नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान शिवसेनाप्रमुखांचे जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहात, पहिलं गद्दाराचा समाचार घ्यायला पाहिजे. कारण हे गद्दार आहेत, काही काही वेळेला माझी चूक होते आणि म्हणून पहिल्या प्रथम माझं कर्तव्य आहे की, माझ्या सांगण्यावरून, माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं, त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता, तरी देखील कशाची तमा न बाळगता तुम्ही निवडून दिलंत, त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की, तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोशावरती या गद्दाराला निवडून दिलं होतं. आपण त्याला मतदान करताना बोटाला काळीशाही लावलीच पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळ फासलेलं आहे, आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे, जाब विचारला पाहिजे, शेवटी गद्दारच गद्दारांच्या कळपात गेला, आता गद्दारांचा कळप म्हणजे काय,तीन चार वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसला तिकडे मिंधे त्यांनी 40 आमदार फोडले आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैलपोळा होता, तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं, 50 खोके, एकदम ओके, आता मला सांगा तेव्हा आमदाराचा भाव 50 असेल 50 खोके तर खासदाराचा किती असेल, म्हणजे हा एक धंदा झालाय, निवडून यायचं, पण निवडून यायचं आपला हमीभाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *