Vaibhav Sooryavanshi IND vs IRE 1st T20 : IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशी वेटिंग लिस्टवर! पहिल्या टी-20 सामन्यात का बसवलं बाहेर? कर्णधार श्रेयस अय्यरने सगळं काही सांगून टाकलं


Why Vaibhav Sooryavanshi Is Not Playing 1st India vs Ireland T20I : आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला पदार्पणाची संधी मिळेल, अशी चाहत्यांना दाट शक्यता होती. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅप (Orange Cap) जिंकून इतिहास रचणाऱ्या वैभवला भारतीय संघात स्थान तर मिळाले, मात्र पहिल्या सामन्याच्या प्लेइंग-11 मध्ये त्याला स्थान देण्यात आले नाही. वैभवला पहिल्या सामन्यात का खेळवले गेले नाही, याचे मुख्य कारण भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केले.

कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला?

नाणेफेकी दरम्यान जेव्हा श्रेयस अय्यरला विचारण्यात आले की, “वैभव सूर्यवंशी आज भारतासाठी पदार्पण करतोय का?” तेव्हा श्रेयसने सांगितले की, “खरंतर, नाही. वैभव हा एक अत्यंत गुणवान आणि उत्कृष्ट खेळाडू आहे यात शंकाच नाही. परंतु, आमच्या संघात सध्या असे काही अनुभवी आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या काही काळात सातत्याने संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य वेळ आल्यावर वैभवला नक्कीच खेळण्याची संधी मिळेल.”

आयपीएल 2026 मध्ये धमाकेदार कामगिरी

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी आयपीएल 2026 मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी (RR) खेळताना जबरदस्त कामगिरी केली आणि 5 मोठे पुरस्कार (अवॉर्ड) जिंकले. अवघ्या 15 वर्षांच्या या युवा फलंदाजाने 16 सामन्यांत 776 धावा करून प्रतिष्ठित ‘ऑरेंज कॅप पटकावली. यासोबत 436.5 पॉईंट्स मिळवून संपूर्ण स्पर्धेतील सर्वात मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरला, ज्यासाठी त्याला 15 लाख रुपये बक्षीस मिळाले. तसेच पूर्ण हंगामात 72 षटकार ठोकून ख्रिस गेलचा एकाच हंगामातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. 

त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याला भारताची टी-20 कॅप मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण वरिष्ठ आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंना प्राधान्य दिल्यामुळे वैभवला सध्या तरी वाट पाहावी लागणार आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव आणि संघ संतुलित ठेवण्याच्या उद्देशाने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, श्रेयस अय्यरच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, आगामी सामन्यांमध्ये योग्य समीकरण जुळून आल्यास वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण फार दूर नाही.

आयर्लंड संघाची प्लेइंग 11 – टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलार्ड.

भारतीय संघाची प्लेइंग 11 – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

हे ही वाचा –

Venezuela Earthquake : फुटबॉल जगतात खळबळ…; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *