Ind vs Ire 1st T20 Live Update : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष! आयर्लंडविरुद्ध किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या LIVE अपडेट्स

India vs Ireland 1st T20 Live Cricket Scorecard In Marathi : भारत आणि आयर्लंड यांच्यातील 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (26 जून) रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. मार्च 2026 मध्ये टी-20 विश्वचषकाचे यशस्वीपणे जेतेपद राखल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी आता श्रेयस अय्यर पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची पहिली मालिका खेळणार आहे. घरच्या मैदानावर खेळणारा आयर्लंडचा संघही त्यांचा नवा कर्णधार लॉर्कन टकर याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.

वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार का?

या संपूर्ण मालिकेत क्रिकेट जगताचे लक्ष अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळलेले आहे. इतक्या लहान वयात त्याची भारतीय संघात निवड होणे हीच एक मोठी गोष्ट आहे. आता त्याला पहिल्या सामन्यात Playing XIमध्ये स्थान मिळून पदार्पणाची संधी मिळते की नाही, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडीत निघणार

जर वैभव सूर्यवंशीला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनेल. असे करून तो थेट ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा 36 वर्षे जुना विक्रम मोडेल. सचिनने 1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते, तर वैभवचे वय सध्या अवघे 15 वर्षे आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *