Last Updated:
Mumbai News : मुंबई शहरातून वेळोवेळी अनेक गुन्हेगारीच्या गंभीर घटना समोर येत असतात. पण सध्या समोर आलेली घटना जी गंभीर असून दोन चिमुकल्यासमोर घडलेली आहे. नक्की काय घडले आहे आणि कुठे घडले आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.
मुंबई : मुंबईत दिवसाढवळ्या घडलेल्या एका लुटमारीच्या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे. फुटबॉल क्लास संपल्यावर आपल्या दोन लहान मुलांना घेऊन घरीत जात असलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना बुधवारी खालसा आणि डॉन बॉस्को या परिसरात घडलेली आहे. महिला ही मुलांचा क्लास संपल्यानंतर कारमध्ये निघाली होती. याच दरम्यान अचानक एका आरोपीने कारचा मागील दरवाजा उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला. त्या वेळी महिलेची दोन्ही मुले मागील सीटवर बसलेली होती.
धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीने त्याच्याकडील चाकू काढत महिलेकडे पैशांची मागणी केली आणि आवाज केल्यास हल्ला करण्याचीही भिती दाखवली, अशी धमकीही त्याने दिली.
मात्र महिला या प्रकाराला घाबरुन न जाता तिने मोठ्याने आरडाओरड करत आरोपीला प्रतिकार केला. त्यानंतर महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने तिच्याकडे धाव घेतली. सर्वांना येताना पाहून आरोपीने कारमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र,नागरिकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
भररस्त्यात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे. गंभीर गोष्ट म्हणजे पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार चाकू जप्त करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अून आरोपीची चौकशी सुरु केली आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 26, 2026 10:49 AM IST
कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडला, दोन चिमुकल्यांसमोरच आईसोबत…, ‘त्या’ कृत्यानं हादरली मुंबई
