Disha Patni: दिशा पाटनीवर दुःखाचा डोंगर; एकाच दिवशी गमावले दोन जिवलग, चाहतेही हळहळले


Disha Patni: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सध्या तिने सोशल मिडीयावर टाकलेल्या एका पोस्टची सध्या एकच चर्चा आहे. दिशावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने एकाच दिवशी आपल्या दोन अत्यंत जवळच्या पाळीव प्राण्यांना गमावल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. एखाद्या पाळीव प्राण्याचं जाणं हे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूएवढचं वेदनादायी असू शकतं. त्यमुळे अनेकजण तिला या पोस्टखाली कमेंट करून धीर देत आहेत.

खरंतर, दिशा हिने तिच्या अधिकृत सोशल मिडियावर दोन फोटोज शेअर केलेले. त्यातील पहिलं तिच्या ‘बेला’ नावाच्या कुत्र्याचं, तर दुसरं ‘जॅस्मिन’ नावाच्या मांजरीचं होतं. बेलाविषयी   भावना व्यक्त करताना दिशाने लिहिलं, “प्रिय बेला… माझ्या आयुष्यात इतके रंग भरल्याबद्दल तुझे आभार. आमचं घर निवडल्याबद्दल आणि मला तुझी आई बनवल्याबद्दल धन्यवाद. तू मला खरं प्रेम काय असतं हे शिकवलंस. तुझ्या डोळ्यांत मला संपूर्ण विश्व दिसायचं. मी तुला खूप मिस करत आहे आणि तुझ्यावर जगात सर्वांत जास्त प्रेम करते. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.” 

 

“तू कायम माझी प्रिन्सेस राहशील”

जॅस्मिनबद्दल लिहिताना दिशाने म्हटलं, “माझी प्रिय जॅस्मिन,  तुझी आई होण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. तू कायम माझी प्रिंसेस राहशील. तुझे छोटेसे पाय माझ्या हाताला स्पर्श करत होते, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर अनुभव होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि खूप मिस करते. रेस्ट इन पीस माय बेबी. तू कायम माझ्या हृदयात जिवंत राहशील.” असं ती म्हणाली.

 

चाहत्यांनाही बसला धक्का

दिशाने एकाच दिवशी या दोन्ही पाळीव प्राण्यांच्या निधनाबद्दल पोस्ट केल्यानंतर सामाजिक माध्यमांवर चाहतेही हळहळत आहेत. अनेकांनी दोघांचं निधन एकाच दिवशी झालं का? असा प्रश्न उपस्थित केला.काही चाहत्यांनी दिशाला धीर देत तिच्या दोन्ही पाळीव प्राण्यांना श्रद्धांजली वाहिली.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *