पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण! टीकेची झोड उठताच संजय दिना पाटील नरमले, जाहीर दिलगिरी व्यक्त 


Sanjay Dina Patil : शिवसेना ठाकरे गटातून नुकताच शिवसेना शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे पत्रकारांना अरेरावीची भाषा केल्यामुळं अडचणीत सापडले आहेत. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन असे शब्द त्यांनी वापरले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. यानंतर संजय दिना पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. जो प्रकार माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये झाला आहे, त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असे पाटील यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले संजय दिना पाटील?

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. या प्रकारानंतर संजय पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. जो प्रकार माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये झाला आहे त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मला वाईट शब्दात शिवीगाळ करून अपमान करत होते. माझ्या परिवाराला आपण जे शिव्या देत आहेत, त्यापासून जरा लांब ठेवा असं मी सांगत होतो. घडलेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो असे संजय दिना पाटील म्हणाले. अनवधानाने माझ्याकडून ते शब्द निघाल्याचे संजय दिना पाटील म्हणाले. 

माझ्या परिवाराला यापासून लांब ठेवा 

ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्या दिवसापासून एकदम वाईट श्बदात आणि शिविगाळ करुन माझा अपमान करत होते. तरीपण मी अपमान सहन केला. आज सकाळी परत पत्रकार मित्र आले होते. त्यांना मी विनंती केली. याबाबत मला काही विचारु नका. मला जे बोलायचे ते बोलून झालं आहे असे सांगितले. माझ्या परिवाराला माझ्या मुलीला, पत्नीला वडिलांना शिव्या देत होते त्यांना लांब ठेवा अशी विनंती करत होते. माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. पत्रकारांनी त्याच गोष्टी विचाण्यात आल्या. माझ्याकडून विनंती करण्यात आली पण ते तसेच सुरु राहिले. त्याच्यातून वाद झाला. माझ्याकडून चुकीने अपश्ब्द निघाले. मी पत्रकारांचे पत्रकार समुहाची दिलगिरी व्यक्त करतो. मी जो प्रवेश केलाय तो ठिक आहे. पण माझ्या परिवाराला यापासून लांब ठेवा अशी विनंती करतो असे संजय दिना पाटील म्हणाले. 

पत्रकारांनी त्यांना त्यांची मुलगी आणि ठाकरे गटाची नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परखड प्रश्न विचारणाऱ्यांना पत्रकारांसोबत संजय दिना पाटील यांनी गैरवर्तन केले. मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय, माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील, मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे, असे संजय दिना पाटील यांनी छाती ठोकून सांगितले. यावेळी संजय दिना पाटील हे  प्रसारमाध्यमांवरही संतापले. तुम्ही माईक माज्या तोंडासमोर कशाला ठरता, आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता, कशाला हे सगळं करताय, असे बोलताना संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.  (Maharashtra Politics news)

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, म्हणाले, ‘कॅमेरा बंद कर नाहीतर मी विसरुन जाईन मी खासदार आहे, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *