संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, शिंदेंकडून दखल, पहिली प्रतिक्रिया समोर – Marathi News | Sanjay Dina Patil threatens journalists Eknath Shindes first reaction


शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचा देखील समावेश आहे. दरम्यान पक्ष प्रवेशाला अजून तीनही दिवस उलटले नाहीत, तोच संजय दिना पाटील यांनी पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय पाटील यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, याविरोधात पत्रकारांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मी या सगळ्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतो. माहिती घेतल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलेनच. परंतु या सर्व विषयावर संजय दिना पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली. मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली, पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी बिलकूल इच्छा नव्हती. पत्रकारांचे आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं संजय दिना पाटील यांनी म्हटल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की पंरतु दररोज, जे कोणी त्यांच्याविरोधात बोलतात. जे दररोज त्यांच्याबद्दल अपशब्द काढतात. तोडून टाका, मारून टाका, घरात घुसा अशा पद्धतीचे अतिशय खालच्या दर्जाचे शब्द वापारतात, ते मीडियासमोर अशी भाषा वापरतात. खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. ते किती दिवसांपासून काय-काय बोलत आहेत, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे, याचा राग संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये आहे. पत्रकारांच्या बाबतीत त्यांच्या मनात कुठलाही राग नाही. तसेच पत्रकारांच्या बाबतीत असं वक्तव्य आम्ही लोकप्रतिनिधिंनी देखील कधी करूनही नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं आहे, की जर आपल्याकडून काही शब्द गेले असतील तर पत्राकरांबद्दल अपमानजनक तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करावी, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय दिना पाटील यांच्या या धमकीमुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापण्याची शक्यता आहे, पत्रकार आक्रमक झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *