Pune Nasrapur Case : ‘आम्ही रोज झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतोय, नराधमाला फाशीच व्हावी’; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुरडीच्या वडिलांची मागणी, आज कोर्टाचा निकाल


पुणे : नसरापूर प्रकरणाचा आज निकाल लागतोय. अवघ्या 16 दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला आणि तेवढ्याच वेळेमध्ये या प्रकरणाची सुनावणी देखील पार पडली. अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सगळी प्रक्रिया झाली. मात्र हा सगळा कालावधी ज्या कुटुंबावरती ही वेळ ओढवली त्यांच्यासाठी तेवढाच त्रासदायक (Pune Nasrapur Case) होता. या घटनेत ज्या चिमुरडीचा मृत्यू झाला त्या मुलीच्या वडिलांनी आजच्या निकालाच्या अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते बोलताना म्हणाले आमच्या पहिल्या दिवसापासन मागण्या होत्या त्या मागण्या आमच्या सरकारने प्रशासनाने न्यायव्यवस्थेने (Pune Nasrapur Case) आमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण केलेल्या आहेत, आणि 14 दिवसात चार्ज शीट (Pune Nasrapur Case) दाखल झालेली आहे आणि पुढे 16 ते अवघ्या 18 दिवसात निकाल लागतोय. त्यामुळे आज आम्ही नक्कीच समाधानी आहोत आणि आमची पहिल्यापासूनच मागणी होती, एक मुलीचा बाप म्हणून की, त्याला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, आज थोड्या वेळातच निकाल येईल न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहेच आणि न्यायदेवता जे म्हणेल ते आज आपल्याला लवकरात लवकर कळेलच, असंही ते म्हणाले आहेत.(Pune Nasrapur Case)

Pune Nasrapur Case : दिवस-रात्र मेहनत घेतली आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं 

या सगळ्या कालावधीमध्ये तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील प्रक्रियेबद्दल कारण आपण पाहतो की खूप वेळ लागतो या सगळ्या प्रक्रियेला तर तुम्हाला कधी वाटलं की आता नाही हे सगळं वेगाने होतय या प्रश्नावरती बोलताना ते म्हणाले की, पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची जी तपास यंत्रणा जी कामाला लागली त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं अनुभवलं आणि तेव्हापासूनच आम्हाला विश्वास बसला प्रशासनावरती सरकारवरती की, आमचं काम वेगात होतंय आणि जस आमच्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण होत आहेत, अशी भावना देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.

Pune Nasrapur Case : त्याला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी

तुम्ही म्हटलात की मृत्युदंडाची शिक्षा तुम्हाला अपेक्षित आहे, या आरोपीकडून आज हा निकाल इथल्या विशेष न्यायालयात सुनावला, जाईल त्याच्यानंतर अनेक प्रक्रिया आहेत, उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय त्यानंतर जर फाशीची शिक्षा सुनावली गेली तर एक मर्स पिटिशन देखील तो आरोपी फाईल करू शकतो तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, जसं या डिस्ट्रिक्ट कोर्टात जसं वेगाने निकाल लागला, तसंही पुढे सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात, याच वेगाने निकाल लागून जी आमची अपेक्षा आहे की त्याला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, तीच पुढे आमची कायम असणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत नक्कीच राहणार आहे आणि शेवटपर्यंत लढत राहणार आहे, असंही ते म्हणालेत.

Pune Nasrapur Case : आमचं कुटुंब पूर्ण उद्धवस्त झालं होतं

या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सावरण सांभाळणं स्वतःला सावरणं हे सोपं नसेल तर कसं तुम्ही केलं हे
सगळं यावर ते म्हणाले, या प्रकरणानंतर आमचं कुटुंब पूर्ण उद्धवस्त झालं होतं, म्हणजे मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक सगळंच आम्ही यातून आमची खूप हानी झाली आणि हे दुःख पचवणं खूपच अवघड होतं, पण या दुःखातून आता आत्ता आत्ता थोडसं बाहेर पडतोय, आजही आम्ही रात्री दोघेही झोपेच्या गोळ्या घेऊनच झोपतोय, यातून माझे जे मित्र मंडळी असतील, माझे माझं कुटुंब
असेल, यांनी आम्हाला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. आमचे सगळे सोसायटीतील सगळे आमचे सदस्य असतील. या सगळ्यांनी आम्हाला नक्कीच यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला आणि आत्ता आम्ही थोडसं यातून दुःखातून सावरतोय, असंही ते म्हणालेत.

Pune Nasrapur Case : नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल लागणार आहे. अवघ्या पावणेदोन महिन्यांत कामकाज पूर्ण झालं आहे. आज अंतिम निकाल येणार आहे. महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिलाच खटला ठरणार आहे. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत ११०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोप पत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे, तसेच तांत्रिक पुरावे जोडले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली होती. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *