Prahaar Teaser: राजकुमार रावच्या ‘प्रहार’मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता बनणार अजमल कसाब! टीझर पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Prahaar Movie Teaser: ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून, यातील एका कास्टिंगने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

News18
News18

मुंबई: २६/११ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस मानला जातो. याच दिवशी पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांनी मुंबईवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात कित्येक निष्पाप लोकांचा जीव गेला, तर अनेक सुरक्षाकर्मी धारातीर्थी पडले. या हल्ल्यावर आधारित आजवर अनेक सिनेमे रिलीज झाले. अशातच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेला क्रूर दहशतवादी अजमल कसाब आणि त्याला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवणारे देशाचे सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्यातील कायदेशीर लढाई आता रुपेरी पडद्यावर येत आहे.

‘ईडा’ चित्रपटाच्या दणक्यापाठोपाठ ‘मॅडडॉक फिल्म्स’ने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि कलाकारांचे लूक, तसेच टीझर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले असून, यातील एका कास्टिंगने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

फिल्ममधील ‘कसाब’ पाहून चाहते शॉक

या चित्रपटाची पहिली झलक समोर येताच मराठी रसिक प्रेक्षकांना एक प्रचंड मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील तरुणींमध्ये लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय अशी इमेज असलेला अभिनेता ललित प्रभाकर थेट अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे. आजवर अत्यंत सोज्वळ, रोमँटिक आणि सकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ललितचा हा भयानक खलनायकी अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत. चॉकलेट हिरोची ही इमेज मोडून एका क्रूर अतिरेक्याची भूमिका स्वीकारल्यामुळे ललितच्या धाडसाचे आणि अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत राजकुमार राव

दुसरीकडे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मुख्य आणि आव्हानात्मक भूमिका बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव साकारत आहे. या भूमिकेसाठी राजकुमारने कोणत्याही प्रकारचा कृत्रिम मेकअप किंवा प्रोस्थेटिक्स वापरण्यास नकार दिला. निकम यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची बोलण्याची धाटणी आणि न्यायालयात युक्तिवाद करण्याची शैली अगदी नैसर्गिक पद्धतीने पडद्यावर आणण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.

कधी रिलीज होणार फिल्म?

दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिनेश विजन यांच्या निर्मितीखाली तयार होत असलेला हा चित्रपट येत्या ७ ऑगस्ट २०२६ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्याव्यतिरिक्त वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान, ललित प्रभाकरला कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर मराठी प्रेक्षकांमधील या चित्रपटाची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

राजकुमार रावच्या ‘प्रहार’मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता बनणार अजमल कसाब! टीझर पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *