Mirzapur the movie Teaser Out: रक्तानं माखणार मिर्झापूरची जमीन; काळजाचा ठोका चुकवणारा 2 मिनिटं 22 सेकंदांचा जबरदस्त टीझर, VIDEO


Mirzapur the Movie Teaser Out: ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर समोर आला आहे. मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा कालीन भैया, गुड्डू आणि मुन्ना भैया सत्तेसाठी रक्ताचे पाट वाहायला तयार झाले आहेत. निर्मात्यांनी ‘मिर्झापूर : द मूव्ही’ (Mirzapur the Movie)चा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला असून हा टिझर सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. आज, (25 जून)  दुपारी 12 वाजता चित्रपटाचा टीझर समोर आला. टीझरच्या आधी निर्मात्यांनी मुन्ना भैया, गुड्डू भैया आणि कालीन भैया यांचे फर्स्ट लूक पोस्टर्स शेअर केले होते. यासोबतच ‘गादी’चे एक खास पोस्टरही समोर आले होते, यावर गादीवर बसण्याचा नाही तर स्वतः चं साम्राज्य बनवण्याचा हा खेळ आहे..’असे लिहिले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतुहल वाढले होते. (Teaser Out)

समोर आलेल्या पोस्टर्समध्ये मिर्झापूरमधील सत्ता, वारसा आणि वैराची झलक पाहायला मिळत आहे.यावेळी खेळ फक्त मिर्झापूरच्या गादीपुरता मर्यादित नाहीय तर तो आता स्वतःचं साम्राज्य उभारण्याचा असल्याचं या टिझरमध्ये दाखवण्यात आलंय.. पोस्टर्स समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली होती. दरम्यान, टीझर समोर आल्याने सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

मिर्झापूरचा 2 मिनिटे 22 सेकंदांचा जबरदस्त टिझर

2 मिनिटे 22 सेकंदांच्या टीझरची सुरुवात कालीन भैया पासून होते. पूजा करत असताना ते म्हणतात ‘काबील औलाद बहुत मुश्किल से मिलती है और कभी कभी नही भी मिलती’ .यानंतर होते गुड्डू भैया ची धमाकेदार एंट्री. तो आपल्या वडिलांना म्हणतो ‘हिस्टरी उठा कर देख लो, जितने भी अँबिशस गँगस्टर है सब टॉप पर पहुंचे है ‘ मुन्ना भय्या आपल्या डायलॉग ने पुन्हा एकदा तुम्हाला मिर्झापूरच्या जुन्या जगात परत घेऊन जातो.

 

पंकज त्रिपाठी यांच्या कालीन भैया या भूमिकेच्या पोस्टरवर लिहिले आहे, “जो आला आहे, तो जाणारही आहे, पण निर्णय कालीन भैयाचाच असेल. मोठ्या पडद्यावर तुमचं स्वागत आहे.” तर अली फजल यांच्या गुड्डू भैयाच्या पोस्टरवर लिहिले आहे, “सुरुवात मजबुरीत केली होती, पण आता मजा येतेय. गुड्डू भैया मोठ्या पडद्यावर येत आहेत, तयार आहात ना?” दिव्यंदू शर्मा उर्फ मुन्ना भैयाच्या पोस्टरवर लिहिले आहे, “आम्ही हिंदी चित्रपटांचे नायक आहोत. सांगितलं होतं ना, आम्ही अमर आहोत. मुन्ना भैयाचा दबदबा आता मोठ्या पडद्यावर.”

कधी प्रदर्शित होणार?

‘मिर्झापूर : द मूव्ही’ हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांत हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अमेझॉन MGM स्टूडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांनी निर्मित केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. चित्रपटात रवी किशन यांच्यासह श्वेता त्रिपाठी, जितेंद्र कुमार,अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, श्रिया पिळगावकर, हर्षिता गौर आणि इतर अनेक कलाकारही झळकणार आहेत.

विशेष म्हणजे, मिर्झापूर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गुन्हेगारी-अ‍ॅक्शन वेबमालिकांपैकी एक मानली जाते. ही मालिका Amazon Prime Video वर प्रदर्शित झाली होती. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल आणि मिर्झापूरच्या पार्श्वभूमीवर आधारित या मालिकेचा पहिला भाग 16 नोव्हेंबर 2018 रोजी, दुसरा भाग 23 ऑक्टोबर 2020 रोजी आणि तिसरा भाग 5 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *