केतनचा मृत्यू झाला तेव्हा लोहगडावर काय घडलं ?
लोहगडावरून पडून केतन अग्रावल या तरूणाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. आधी सर्वांना हा एक अपघात वाटत होता, पण नंतर या केसला नवं वळं मिळालं. केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच संगनमातने केतनचा काटा काढल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी सिया चेतनला अटक केली असून त्यांना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या केसच्या तपासादरम्यान रोज नवनवे खुलासे होत आहेत. सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले गेले, परंतु सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांतून समोर आलेल्या विसंगतींमुळे हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद बनले , असा पोलिसांचा दावा आहे.
सियावर विश्वास आहे, केतनच्या कुटुंबियांनी केला होता दावा
तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या मृत्यूनंतर सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूबाबत कोणतीही शंका व्यक्त केली नाही. तसेच सिया गोयलने सांगितलेला घटनाक्रम आणि तिचं म्हणणं ग्राह्य मानून त्याला दुजोरा दिला. या घटनेवरून कोणत्याही अनावश्यक वादात पडण्याची आपली इच्छा नाही, असंही कुटुंबियांनी स्पष्ट केलं होतं. मात्र कुटुंबीयांना यात विशेष रस नसतानाही पोलिसांनी घटनास्थळ आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंचा सखोल तपास सुरूच ठेवला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासातून अशा काही गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या दोघांमधील संपर्क आणि घटनाक्रम पाहता, यात एखादे कारस्थान असण्याची शक्यता बळावली असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, तपास अद्याप सुरू असून त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केलं,
सियाचा चेतनला वारंवार इशारा
केतन आणि सियाचा फेब्रुवारीत साखरुडा झाला, नोव्हेंबरमध्ये लग्न ठरलं होतं. केनत्चाय मृत्यूनंतर 21 जून रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या एका टीमने लोहगड किल्ल्याचा दौरा करून तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
या फुटेजमध्ये केतन आणि सिया यांच्या जवळ ‘हुडी’ घातलेला एक तरुण दिसून आला. पहिली गोष्ट म्हणजे, कडक उकाडा असूनही त्याने संपूर्ण शरी, हात-तोंड झाकणारी हुडी घातली होती. दुसरी गोष्ट म्हणजे, सिया त्या व्यक्तीकडे वारंवार मागे वळून पाहताना सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. एका क्षणी तिने हाताने काहीतरी खूण केल्याचंही व्हिडीओमध्ये दिसलं आणि केतनने त्यावर प्रतिसाद दिला – जणू काही सिया विचारत होती, “मी त्याला आता ढकलून देऊ का?” सीसीटीव्हीमध्ये टिपल्या गेलेल्या या हालचालींमुळे पोलिसांचे लक्ष वेधले गेलं आणि त्यांनी त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. जेव्हा आपण किल्ल्यावर असू तेव्हा मी खाली वाकेन, तेव्हा तू समजून जा की केतनला धक्का देण्याची हीच ती वेळ आहे, असंही सियाने चेतनला सांगितल्याची माहिती समोर आली.
सियाच्या बदलत्या जबाामुळे वाढला संशय
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने सुरुवातीला सांगितलं होतं की फोटो काढत असताना केतन दरीत पडला. मात्र, नंतरच्या चौकशीत तिच्या जबाबात बदल झाला; तिने असा दावा केला की, ट्रेकनंतर ती विश्रांती घेत होती आणि तिने पाणी मागितल्यावर केतन तिला बाटली देत असताना त्याचा तोल गेला. या दोन जबाबांमधील विसंगती तपासातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरल्याचं पोलिसांनी नमूद केलं.
अवघ्या 48 मिनिटांत ट्रेकवरून परतला चेतन
शिवाय, तपासामध्ये केतन अग्रवालच्या मोबाईल फोनमध्ये त्या दिवशी काढलेला एकही फोटो सापडला नाही. त्या ट्रिपमधीस एकही फोटो नसणे हे खूप आश्चर्यकारक होतं. तसेच, सियाने केतनसोबत जिथे मुक्काम केला होता, ती जागा सामान्य पर्यटक विश्रांतीसाठी थांबतील अशी नव्हती, असा दावाही पोलिसांनी केला. कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केल्यानंतर, पोलिसांनी हुडी घातलेल्या त्या व्यक्तीची ओळख चेतन चौधरी अशी पटवली आणि या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला. विशेष म्हणजे, चेतन अवघ्या 48 मिनिटांतच किल्ल्यावर जाऊन परत आला होता , जे अजब , असामान्य होतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, या घटनेमागील संपूर्ण सत्य शोधून काढण्यासाठी पोलीस सर्व पुरावे एकत्र करत आहेत.