Ketan Agrawal Case : गुन्हेगार एकतरी पुरावा मागे सोडतोच, पण सियाच्या ‘या’ 5 मोठ्या चुका पोलिसांनी पकडल्या अन् – Marathi News | Ketan Agrawal Case Siya Goel and Chetan made 5 biggest mistakes Know more about this murder mystery


Ketan Agrawal Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी सुरु आहे… सुरुवातीला अंस वाटलं की, लोहगडावरुन खाली पडल्यामुळे केतनचं निधन झालं, शिवाय केतनच्या निधनानंतर सियाने केलेला भावूक पोस्टमुळे देखील कोणीच तिच्यावर संशय घेतला नाही. पण सत्य फार काळ लपत नाही… असं म्हणतात ते अखेर खरं होताना दिसत आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी, एक तरी पुरावा मागे सोडतो, त्याच पुराव्याच्या आधारावर पोलीस संपू्र्ण सत्य समोर आणतात, पण सियाने तर अशा 5 चुका केल्या ज्यामुळे की मोठ्या अडचणीत अडकली.

सिया गोयलची पहिली चूक – केतनच्या बहिणीला आलेला संशय

केतनच्या अंत्यसंस्कारानंतर सिया त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलेली. केतनच्या मृत्यूच्या 4 दिवसांनंतर सिया त्याच्या घरी गेली. तेव्हा केतनच्या बहिणीने असे काही प्रश्न विचारले, ज्यांची उत्तर देताना सिया घाबरली. ज्यामुळे केतनच्या बहिणीला संशय आहे. त्यानंतर केतनच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा आपापल्या पद्धतीने तपास केला आणि डिजिटल फॉरेन्सिक्स तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) यांची तपासणी केली, ज्यामुळे या प्रकरणाचे गूढ उलगडू लागलं.

सिया गोयलची दुसरी चूक – कॉल रेकॉर्ड आणि चेतनसोबत अफेअर

पोलिसांनी जेव्हा सिया हिच्या मोबाईल रेकॉर्डचा तपास केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं. चेतन चौधरी याच्या असलेलं अफेअर समोर आल्यानंतर प्रकरणाचा तपास पुढे सरकत गेला. तपासात समोर आलं की, गेल्या 3 वर्षांपासून सिया आणि चेतन रिलेशनशिपमध्ये होते. 1 जानेवारी ते जून या कालावधीत, त्या दोघांनी फोन कॉल्स, व्हॉट्सॲप आणि फेसटाइमद्वारे 2004 वेळा एकमेकांशी संपर्क साधला. या सहा महिन्यांत त्यांनी एकूण 238 तासांहून अधिक काळ संवाद साधला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 16 आणि 17 जूनच्या रात्री व्हिडिओ आणि फेसटाइम कॉल्सदरम्यान त्यांनी हत्येचा कट रचला.

सिया गोयलची तिसरी चूक – सतत लोहगड जाण्यासाठी हट्ट

केतनची बहीण संजना आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडे केलेल्या चौकशीतून असं समोर आलं की, फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यापासून सिया केतनवर लोहगड किल्ल्यावर नेण्यासाठी सतत दबाव टाकत होती. 15 दिवसांच्या कालावधीत तिने केतनला किल्ल्यावर नेण्यासाठी चार वेळा प्रयत्न केलं. सर्वात आधी तिने 31 मे रोजी केतनला लोहगडला नेलं होतं. त्यानंतर, 4 जून रोजी तिने पुन्हा तिथे जाण्याचा आग्रह धरला, परंतु केतनच्या आईने त्याला नकार दिला. अखेर 19 जून रोजी केतन, सियासोबत लोहगडावर गेला आणि परत कधी आलाच नाही.

सिया गोयलची चौथी चूक – बाली ट्रिप दरम्यान केतनचा गायब झालेला पासपोर्ट

सिया आणि केतन यांनी इंडोनेशियामध्ये त्यांचं ‘प्री-वेडिंग शूट’ करण्याचं ठरवलं होतं आणि त्यासाठी दोघेही प्रवासाला निघाले होते. दरम्यान, सिया आणि चेतन यांना लग्नापूर्वी केतनला कोणत्याही परिस्थितीत वाटेतून दूर करायचं होतं. याच काळात, प्रवासापूर्वी केतनचा पासपोर्ट गूढरीत्या हरवला, ज्यामुळे त्यांना विमानतळावरून परत घरी यावं लागलं. आता पोलिसांना संशय आहे की, सियानेच तो पासपोर्ट गायब केला होता.

सिया गोयलची पाचवी चूक – सकाळी 7 ते सायंकाळी 5:40 पर्यंत चेतनचं इंटरनेट बंद होतं

पोलिसांपासून वाचण्यासाठी, चेतनने 18 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:40 पर्यंत आपल्या फोनचं इंटरनेट पूर्णपणे बंद ठेवलं होतं. लोहगड येथे आपलं ‘डिजिटल लोकेशन’ कळू नये, म्हणून त्याने ही शक्कल लढवली होती. एवढंच नाही तर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा ‘हुडी’ घातलेला तरुण चेतन असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *