Vaibhav Sooryavanshi: 19 चौकार अन् 6 षटकार, वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा मैदानात धुमाकुळ – Marathi News | Vaibhav sooryavanshi brother ashirwad suryavanshi scores 168 runs 19 fours 6 sixes


भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जाणारा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये धुमाकुळ घातल्यानंतर आता वैभव आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकुळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकते. वैभव केवळ 15 वयातच इतका चांगला परफॉमन्स करत आहे पण यापेक्षाही त्याच्या भाऊ हा वरचढ आहे. वैभवचा धाकटा भाऊ, आशीर्वाद सूर्यवंशी, एका धडाकेबाज खेळीने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका स्थानिक संघाकडून खेळताना, आशीर्वादने 119 चेंडूंमध्ये 168 धावा केल्या. या खेळीदरम्यान, 10 वर्षीय आशीर्वादने 19 चौकार आणि सहा षटकार मारले. 10 वर्षीय आशीर्वादने बुधवारी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपली प्रभावी खेळी शेअर केली. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे समस्तीपूरमध्ये खेळल्या गेलेल्या स्थानिक सामन्यात ऋषभ इलेव्हनला वैशाली 1 वर विजय मिळवता आला. या महिन्याच्या सुरुवातीला, समस्तीपूरमध्ये ताजपूर क्रिकेट अकादमीकडून खेळताना एका स्थानिक सराव सामन्यात आशीर्वादने 87 चेंडूंमध्ये 103 धावा केल्या होत्या.

आशीर्वादचे वडील, संजीव यांनी म्हटले आहे की, “पुढील दोन वर्षांत आशिर्वादला वैभवसारखा एक महान खेळाडू म्हणून घडवण्याची माझी तयारी सुरु आहे. आशीर्वाद सध्या बिहारमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. आशीर्वादच्या शेवटच्या शतकानंतर, त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला.” फेसबुक पोस्टमध्ये संजीव यांनी लिहिले, “माझ्या धाकट्या मुलाने, आशीर्वाद सूर्यवंशीने, आज एका सराव सामन्यात त्याचे पहिले शतक झळकावले. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्याच्यावर आपले प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करावा.”

वैभवला दोन भाऊ आहेत. त्याचा मोठा भाऊ उज्ज्वल आणि धाकटा भाऊ आशीर्वाद आहे. त्यांचे आई-वडील, संजीव आणि आरती यांनी दोन्ही मुलांच्या क्रिकेट कारकिर्दीला घडवण्यात आणि पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे, वैभवची पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या सात सामन्यांच्या दौऱ्यासाठीच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्याची सुरुवात 26 जून रोजी बेलफास्ट येथे होईल. आयर्लंडविरुद्ध दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील, त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका होईल.

आयर्लंड मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20: 26 जून
दुसरा टी-20: 28 जून



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *