Video : अलका याज्ञिक यांची खालावलेली प्रकृती, पद्मभूषण स्वीकारताना नीट चालताही येईना, व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत – Marathi News | Alka yagnik health update padma vibhushan award ceremony video viral on social media


Video : प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना राष्ट्रपती भवनात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.. अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 हून अधिक भाषांमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. पण जेव्हा अलका याज्ञिक पुरस्कार स्वीकारत होत्या, तेव्हा अनेकांचं लक्ष फक्त त्यांच्या पुरस्कारावर नव्हतं तर, त्यांच्या प्रकृतीकडे देखील होतं. सांगायचं झालं तर, कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चाहत्यांनी गायिकेच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पारंपरिक लूकमध्ये अलका याज्ञिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचल्या होत्या. पण यादरम्यान प्रचंड कमजोर दिसल्या. त्यांनी नीट चालता देखील येत नव्हतं. एका महिला सुरक्षारक्षकाने अलका याज्ञिक यांना स्टेज पर्यंत पोहोचवलं. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अलका याज्ञिक यांची प्रकृती दिवसागणिक चिंताजनक होत आहे. अलका याज्ञिक यांची प्रकृती अद्यापही सुधारलेली नाही.

राष्ट्रपती भवनात आयोजित पद्म पुरस्कार सोहळा हा देशातील अत्यंत प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक मानला जातो. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करून त्यांना अभिवादन केलं. पण त्यांची प्रकृतीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत.

अलका याज्ञिक कोणत्या आजाराचा करत आहेत सामना?

अलका याज्ञिक गेल्या जवळपास दोन वर्षांपासून एका दुर्मिळ मज्जासंस्थेविषयक आणि श्रवणशक्तीशी संबंधित विकाराने त्रस्त आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल सांगितलं देखील होतं, एका विमान प्रवासानंतर खाली उतरल्यावर त्यांना ऐकायला येणं बंद झालं. त्यानंतरच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना ‘दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस’ असल्याचे निदान झालं.

गायिकेने सांगितलं होतं की, एका व्हायरल अटॅक ही समस्या उद्भवली आणि त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. या परिस्थितीचा स्वीकार करून त्याविरुद्ध लढा देण्याचा त्या अजूनही प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रकृतीत आतापर्यंत किती सुधारणा झाली आहे, याबद्दल त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या पूर्णपणं बरी होणं कठीण नाही. पण औषधं आणि सततच्या थेरेपीनंतर ही समस्या नियंत्रणात येऊ शकते… असं देखील सांगितलं जात आहे की, अलका याज्ञिक यावर उपचार घेत आहेत. पण त्यांच्या प्रकृतीत अद्याप किती सुधारणा झाली आहे… याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *