ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!


ICC Ranking: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. यापूर्वी तो पाचव्या क्रमांकावर होता. एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलपेक्षा गिल केवळ 24 रेटिंग पॉइंट्सनी मागे आहे. गिलने अफगाणिस्तानविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 238 धावा केल्या.

इशान किशनची 21 स्थानांची झेप 

दरम्यान, इशान किशनने 21 स्थानांची झेप घेत 43 वे स्थान पटकावले आहे. साप्ताहिक क्रमवारीत भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने 34 स्थानांची आणि अर्शदीप सिंगने 16 स्थानांची प्रगती केली आहे. न्यूझीलंडचा मॅट हेन्री भारताच्या जसप्रीत बुमराहसोबत कसोटी क्रमवारीत संयुक्तपणे अव्वल गोलंदाज बनला आहे. 36 वर्षांत प्रथमच न्यूझीलंडच्या गोलंदाजाने अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी, 1990 मध्ये रिचर्ड हॅडली अव्वल कसोटी गोलंदाज होता.

रोहित चौथ्या क्रमांकावर कायम 

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला. याचा परिणाम विराटच्या क्रमवारीवर झाला आहे. गेल्या आठवड्यात तो दुसऱ्या स्थानावर होता, पण यावेळी तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. रोहित शर्मा चौथ्या स्थानावर कायम आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत एका अर्धशतकासह 143 धावा केल्या.

तीन भारतीय गोलंदाजांनाही फायदा

एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन भारतीय खेळाडूंनी लक्षणीय झेप घेतली आहे. अर्शदीप सिंग 16 स्थानांनी पुढे जात 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. प्रसिद्ध कृष्णाने 34 स्थानांची झेप घेत 58 वे स्थान मिळवले आहे, तर वॉशिंग्टन सुंदरने 17 स्थानांची झेप घेत संयुक्तपणे 71 वे स्थान पटकावले आहे. एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशीद खान पहिल्या, पाकिस्तानचा अबरार अहमद दुसऱ्या आणि इंग्लंडचा जोफ्रा आर्चर तिसऱ्या स्थानावर आहे.

जो रूटने कसोटीत अव्वल स्थान पटकावले

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जो रूट दोन स्थानांनी पुढे जात अव्वल स्थानी पोहोचला आहे. हॅरी ब्रूक दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या स्थानावर आहे.

हेन्रीने बुमराहसोबत अव्वल स्थान पटकावले

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या 253 धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. हेन्री आता जसप्रीत बुमराहसोबत अव्वल स्थानी आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये कागिसो रबाडाला मागे टाकल्यापासून बुमराह अव्वल स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क तिसऱ्या स्थानावर आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *