DYSP Transferred: राज्यातील DYSP दर्जाच्या ११५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अधिवेशन काळात फडणवीसांकडून बदल्यांचा धडाका | महाराष्ट्र बातम्या


कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?

नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र पोपटराव जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. तर नागपूर शहरातील सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित शिवाजीराव पाटील यांची नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागात नियुक्ती झाली आहे. पालघरच्या बोईसर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास संपत नाईक यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे.

नागपूर ग्रामीणच्या रामटेक उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सुदाम बरकते यांची भंडारा जिल्ह्यातील पवनी उपविभागात DYSP बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त सचिन प्रकाश हिरे यांची पुणे शहरात नियुक्ती झाली आहे. नाशिक येथील एटीएसचे अपर पोलीस अधीक्षक माधव ज्ञानोबा रेड्डी यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त अमोल विलास कोळी यांची यवतमाळ उपविभागात पोलीस उपअधीक्षक बदली झाली आहे. मीरा-भाईंदर वसई-विरार येथील सहायक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने (पाटील) यांची सांगली येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त मंदार मल्लिकार्जुन जावळे यांची परिवहन विभागाच्या दक्षता शाखेत बदली झाली आहे.

पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त विशाल शामराव हिरे यांची नवी मुंबईत नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड उपविभागाचे अधिकारी दिनेशकुमार माधवराव कोल्हे यांची सीआयडी, छत्रपती संभाजीनगर येथे अपर पोलीस अधीक्षक (एटीएस) पदावर बदली करण्यात आली आहे. सातारा शहर उपविभागाचे अधिकारी राजीव धुराजी नवले यांची पुणे सीआयडीमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

नाशिक ग्रामीणमधील कळवण उपविभागाचे अधिकारी किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कोकण घटकात अपर उपआयुक्त (एटीएस) म्हणून बदली झाली आहे. नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागातील अधिकारी संतोष बाबुराव गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सोलापूर ग्रामीणमधील अक्कलकोट उपविभागाचे अधिकारी विलास विठ्ठल यामावार यांची पुणे सीआयडीमध्ये बदली झाली आहे.

मीरा-भाईंदर वसई-विरारचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग बहादुरराव देसाई यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. पुणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त नंदिनी अमित वग्यानी (नंदा राजेंद्र पराजे) यांची पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सई प्रताप भोरे-पाटील यांची पुणे येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणच्या शिरूर उपविभागाचे अधिकारी प्रशांत बाबासो ढोले यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. गडचिरोलीतील घोट उपविभागाचे अधिकारी जगदीश रामराव पांडे यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. ठाणे ग्रामीणच्या शहापूर उपविभागातील अधिकारी मिलिंद देवराम शिंदे यांची ठाणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पूनम संभाजी पाटील यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. धाराशिवच्या तुळजापूर उपविभागाचे अधिकारी निलेश विश्वासराव देशमुख आणि ठाणे शहरातील प्रिया देविदास डमाळे यांची पिंपरी-चिंचवड DYSP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे सीआयडीमधील अपर पोलीस अधीक्षक तृप्ती अर्जुन जाधव यांची धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली झाली आहे.

नांदेडच्या देगलूर उपविभागाचे अधिकारी संकेत सतीश गोसावी यांची पुणे सीआयडीमध्ये बदली झाली आहे. सांगलीच्या मिरज उपविभागाचे अधिकारी प्रणिल प्रफुल्ल गिल्डा यांची कोल्हापूरच्या शाहूवाडी उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या करवीर उपविभागातील सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर यांची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागात बदली झाली आहे.

पुणे ग्रामीणच्या बारामती उपविभागाचे अधिकारी सुदर्शन साईदास राठोड यांची पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे अधिकारी संकेत नथुराम देवळेकर यांची परभणी शहर उपविभागात बदली करण्यात आली आहे. गोंदियातील तिरोडा उपविभागाचे अधिकारी साहील उमाकांत झरकर यांची चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी उपविभागात नियुक्ती झाली आहे.

गोंदियाच्या आमगाव उपविभागाचे अधिकारी प्रमोद मयाराम मडामे यांची नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागात बदली झाली आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली उपविभागाचे अधिकारी चैतन्य वसंतराव कदम यांची बारामती उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीच्या विटा उपविभागाचे अधिकारी विपुल विजय पाटील यांची बुलढाणा उपविभागात बदली करण्यात आली आहे.

गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागाचे अधिकारी रविंद्र दिनकर भोसले यांची शिरूर उपविभाग, पुणे येथे बदली झाली आहे. परभणीतील पूर्णा उपविभागाचे अधिकारी समाधान माधवराव पाटील यांची गडचिरोलीच्या सिरोंचा उपविभागात नियुक्ती झाली आहे. गोंदियाच्या देवरी उपविभागाचे अधिकारी विवेक हरिदास पाटील यांची कोल्हापूरच्या गडहिंग्लज उपविभागात बदली करण्यात आली आहे.

गडचिरोली मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक योगेश चंद्रकांत रांजणकर, गोंदियाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी ज्ञानदेव बाणकर आणि बुलढाण्यातील देऊळगावराजा उपविभागाच्या अधिकारी मनीषा विश्वंभर कदम यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

गडचिरोलीच्या अहेरी उपविभागाचे अधिकारी अजय विलास कोकाटे यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. अहेरी मुख्यालयातील विशाल अर्जुन नागरगोजे यांची शहापूर उपविभाग, ठाणे ग्रामीण येथे नियुक्ती झाली आहे. गडचिरोलीच्या सिरोंचा उपविभागातील संदेश तारसिंग नाईक यांची सांगलीच्या मिरज उपविभागात बदली करण्यात आली आहे.

यवतमाळ उपविभागातील दिनेश किसन बैसाने यांची पालघरच्या बोईसर उपविभागात नियुक्ती झाली आहे. गडचिरोली उपविभागातील सूरज विठ्ठल जगताप यांची सोलापूर ग्रामीण उपविभागात बदली करण्यात आली आहे. पालघरच्या डहाणू उपविभागातील अंकिता कैलास कणसे यांची ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत नियुक्ती झाली आहे.

अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे पोलीस उपअधीक्षक वसंत वामन कुंवर, नागपूर शहरातील सहायक पोलीस आयुक्त अनिता उदय मोरे, तसेच राज्य गुप्तवार्ता विभागातील स्वप्ना मधुकर बोधके यांची पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

याशिवाय गडहिंग्लज उपविभागाचे अधिकारी रामदास जयसिंग इंगवले यांची पुणे शहरात नियुक्ती झाली आहे. यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील हनुमंत अमृतराव गायकवाड यांची नंदुरबार उपविभागात बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय मारुती थोपटे यांची रत्नागिरी उपविभागात नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, शेखर देशमुख, सचिन सांगळे, गजानन राठोड, शशीकिरण काशीद, सचिन बारी, संदीप मिटके, मयूर भुजबळ, बाजीराव महाजन, राहुल झालटे, पूजा नंगरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *