ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांच्या घराबाहेर मध्यरात्री फटाके फोडले, झाडांना आग; सुधीर सोपलांची पोलिसांत तक्रार


Solapur Barshi News : बार्शीचे ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal)  यांच्या घराच्या परिसरातील झाडांना आग लागल्याची घटना घडली होती. ही आग काल मध्यरात्री लागी होती. काही तरुणांनी सोपल यांच्या घराच्या शेजारी फटाके उडवल्याने झाडांना आग लागल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घरातील काही साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.  

आमदार दिलीप सोपल यांचे बंधू सुधीर सोपल यांनी पोलिसांत फिर्याद दिली

या प्रकरणी आमदार दिलीप सोपल यांचे बंधू सुधीर सोपल यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 8 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जीविताला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने घराच्या जवळ फटाके उडवल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे.  त्यांच्या तक्रारीनंतर नाथा मोहिते, योगेश लोंढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणजुझांरे, नागेश मोहिते, अंबादास रणजुजारे यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आमदार दिलीप सोपल समर्थक तथा बार्शीचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी निषेध व्यक्त केला आहे. राजकारणाची पातळी खालवत चालली आहे, त्यातून अशा पद्धतीचे कृत्य करण्यात आलं असल्याचे नागेश अक्कलकोटे यांनी सांगितले. पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी बार्शीचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *