Rohit Sharma : राष्ट्रपती भवनात रोहितचा बिनधास्त अंदाज, चेहऱ्यावर गोड हास्य, मोदींना नमस्कार अन्…पद्मश्री अवॉर्ड स्विकारतानाचा क्षण, VIDEO | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

Rohit Sharma Padma Shri Award : राष्ट्रपदी द्रोपदी मुर्मू रोहित शर्माला पद्मश्री अवॉर्ड प्रदान करतात.रोहित शर्मा हा अवॉर्ड स्विकारताना प्रचंड आनंदात आहे. रोहित शर्माचा हा पद्मश्री अवॉर्ड स्विकारतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Padma Shri Award
Rohit Sharma Padma Shri Award

Rohit Sharma Padma Shree Award : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा याचा आज पद्मश्री अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात त्याचा गौरव करण्यात आला. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून रोहित शर्मा आणि मुंबईचे चाहते सुखावले आहेत.

रोहित शर्माला पद्मश्री अवॉर्ड स्विकारतानाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आनंद होईल.व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर पद्मश्री अवॉर्ड स्विकारायला येताना रोहित शर्माच्या चेहऱ्यावर गोड हास्य आहे. त्यातसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहताच रोहित शर्मा त्यांना नमस्कार करतो.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्याच्या आदरातिथ्यावर नमस्कार करून एक गोड हास्य देत टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याच कौतुक करतात.

यानंतर राष्ट्रपदी द्रोपदी मुर्मू रोहित शर्माला पद्मश्री अवॉर्ड प्रदान करतात.रोहित शर्मा हा अवॉर्ड स्विकारताना प्रचंड आनंदात आहे. रोहित शर्माचा हा पद्मश्री अवॉर्ड स्विकारतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे रोहित शर्मासाठी अतिमहत्वाच्या असणाऱ्या या दिवशी त्याची बायको रितिका सजदेह आणि रोहित शर्मा भाऊ विशाल शर्मा दोघेही राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. तसेच ज्यावेळी रोहित शर्माला सन्मानित केले जात होते. त्यावेळी रितिका सजदेह आणि विशाल शर्मा आपल्या जागेवर उभं राहुन आणि टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करताना दिसत आहे. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

Rohit Sharma : राष्ट्रपती भवनात रोहितचा बिनधास्त अंदाज, चेहऱ्यावर गोड हास्य, मोदींना नमस्कार अन्…पद्मश्री अवॉर्ड स्विकारतानाचा क्षण, VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *