समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर


बुलढाणा : राज्यातील अपघाताच्या (Accident ) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून कालच बदलापूरमधील भीषण अपघाताची घटना समोर आली होती. तर, समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना देखील नेहमीच समोर येत आहेत. आता, पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले असून दोन लहान मुले जखमी आहेत. यासह, कारचा चालक देखील गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi highway) दुसरबीड जवळ ही दुर्घटना घडली. 

समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळ भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील पती-पत्नी जागीच ठार झाले असून कारमधील दोन चिमुरडे आणइ कार चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जालना येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे आपल्या पत्नी गुलसीतान बी आणि कुटुंबासह नागपूरवरून संभाजीनगरच्या दिशेने जात होते. मात्र, समोर धावणाऱ्या ट्रकला त्यांच्या फोर्च्यूनर कारने अनियंत्रित होऊन धडक दिली. या धडकेत डॉ.सय्यद आसिफसह पत्नी गुलसितान बी हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले असून त्यांच्या गाडीचा चालक आणि दोन लहान मुले जखमी झाले आहेत. हे कुटुंब नागपूरवरून संभाजीनगर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात होते. 

मुंबईतील द्रुतगती महामार्गावर अपघात

मुंबईतील पहिल्या पावसात पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. बोरिवली देवीपाडा मेट्रो स्टेशनजवळ सकाळी 11 वाजता भरधाव टेम्पोचा अपघात झाला. अंधेरीहून दहिसरच्या दिशेने जाणारा टेम्पो डिव्हायडर ओलांडून विरुद्ध लेनमध्ये घुसला, टेम्पोची 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक बसली असून अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला.  घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले, अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात आली असून टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा

सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *