पुणे: परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून नुकताच वडिलांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात स्थिरावलेला २४ वर्षांचा तरुण उद्योजक केतन अग्रवाल… (Ketan Agrawal Death) घरात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या त्याच्या शाही विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. राजस्थानमधील जयपूर येथे एका भव्य पॅलेसमध्ये तब्बल १७ कोटी रुपये खर्चून या विवाहसोहळ्यासाठी एक पॅलेस देखील बुक केला होता. व्हीआयपी पाहुण्यांच्या (Ketan Agrawal Death) प्रवासासाठी दोन खाजगी विमानेही बुक करण्यात आली होती. संपूर्ण अग्रवाल कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, एका विदारक घटनेने या आनंदाचे रूपांतर कधीही न भरून निघणाऱ्या दुःखात केले.(Ketan Agrawal Death)
१९ जून रोजी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिचा वाढदिवस होता. हाच वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी, म्हणजेच १८ जूनला हे जोडपे लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी केतनचा फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आली. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात वाटत होता, मात्र अवघ्या ५ दिवसांत पोलिसांनी या मृत्यूमागील जे भयंकर गुपित उघड केले, त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. केतनचा मृत्यू अपघात नव्हता, तर त्याचा पूर्वनियोजित खून करण्यात आला होता; आणि हा कट रचणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची होणारी नवरी ‘सिया गोयल’ हीच निघाली.(Ketan Agrawal Death)

Ketan Agrawal Death: कडक उन्हात ती ‘हुडी’… आणि पोलिसांचा संशय बळावला
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकांनी कठीण परिस्थितीत बचावकार्य राबवून केतनचा मृतदेह ४०० फूट खोल दरीतून बाहेर काढला. सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना घटनाक्रमात काही विसंगती जाणवू लागल्या.
रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली. यावेळी पोलिसांना एका संशयित तरुणाच्या हालचाली दिसल्या. गेल्या आठवड्यात लोणावळ्यात प्रचंड उकाडा आणि कडक ऊन असतानाही, एक तरुण अंगात जाडजूड ‘हुडी’ (जॅकेट) घालून वावरत होता. त्याने कानात हेडफोन घातले होते आणि हुडीच्या साहाय्याने तो स्वतःचा चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. भर उन्हातल्या या अजब पेहरावाने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली.
Ketan Agrawal Death: संधी साधली अन् कड्यावरून ढकलले…
त्या संशयित तरुणाचा माग काढत पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा सिया गोयलच्या क्रूर कटाचा पर्दाफाश झाला. सियाचे केतनशी लग्न ठरले असले तरी ती या नात्यात खूश नव्हती. तिने आपल्या एका मित्रासोबत मिळून केतनला कायमचे संपवण्याचा प्लॅन आखला होता. १८ जून रोजी ठरल्याप्रमाणे सिया केतनला घेऊन लोहगडाच्या एका निर्जन कड्यावर पोहोचली. तिथे आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून, सियाने तिच्या ‘हुडी’ घातलेल्या मित्राच्या मदतीने केतनला थेट दरीत ढकलून दिले. ४०० फूट खोल कोसळल्यामुळे केतन गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा सियाचा प्रयत्न अखेर फसला आहे. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सिया गोयल आणि तिच्या त्या साथीदार मित्राला बेड्या ठोकल्या असून, या हाय-प्रोफाइल मर्डर केसचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Ketan Agrawal Death: तांत्रिक पुरावे आणि ‘लव्ह ट्रँगल’ उघड
मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपनीय माहिती, साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या (CDR, IPDR एनालिसिस आणि सीसीटीव्ही फुटेज) आधारे सखोल तपास सुरू केला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली की, सिया गोयल हिचे पुणे मार्केट यार्ड परिसरात दुकान असलेल्या चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. या विवाहबंधनात केतन आडकाठी ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला वाटेतून हटवण्याचा पूर्वनियोजित कट रचला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कलम १०३ (BNS) आणि ६१(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा (गु.र.नं. १६८/२०२६) दाखल केला आहे. आधिक तपासात त्यांनी कबुली देखील दिली आहे. त्यांचे प्रेमसंबंध होते.
Ketan Agrawal Death: प्री-वेडिंग शूट दरम्यान ‘बाली’ येथे जाताना पासपोर्टची चोरी
पोलीस तपासात यापूर्वी झालेल्या दोन प्रयत्नांची धक्कादायक माहिती समोर आली आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. ते पुण्यातून मुंबई विमानतळाच्या दिशेने निघालेही होते. मात्र, विमानतळावर पोहोचल्यावर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचे समजले आणि त्यांना दौरा रद्द करून परत यावे लागले. तपासात उघड झाले की, केतनने बालीला जाऊ नये म्हणून सियाने स्वतःच त्याचा पासपोर्ट चोरून तो कुठेतरी लपवून (Displace) ठेवला होता.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या