पुणे : पुण्याच्या लोहगडावरून घटनेनं आता वळण घेतलं आहे. फोटोची पोज देताना केतन अग्रवाल घसरुन (Pune Crime News) दरीत पडला नसून त्याला ढकलून (Pune Crime News) दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. गुरुवारी होणाऱ्या पत्नीचा (Pune Crime News) वाढदिवस होता. त्या निमित्ताने केतन आणि होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोज देताना तो घसरुन पडला, असं समोर आलं होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं (Pune Crime News)उघड झालं आहे. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलं हे. या घटनेत होणाऱ्या पत्नीचा समावेश आहे का? यासंबंधीची चौकशी सुरु आहे. सोबतचं प्रियकराला कोणी-कोणी साथ दिली का? याची चौकशी सुरु आहे.(Pune Crime News)
Pune Crime News: नेमकं काय घडलं?
पुण्यातील ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असलेल्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) ही घटना घडली आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गडावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता फोटोची पोज देताना केतन अगरवाल घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
Pune Crime News: वाढदिवसाचा आनंद क्षणात बदलला शोकात
केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस (Birthday) होता. हा दिवस खास करण्यासाठी त्या दोघांनी सकाळीच लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी (Trekking) जाण्याचा बेत आखला होता. दोघेही सकाळी लवकर गडावर पोहोचले. किल्ल्यावर भटकंती सुरू असताना आनंदाचे हे क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपले जात होते. किल्ल्यावरील दरीच्या बाजूला उभे राहून केतन एका फोटोसाठी पोज देत होता. त्याचवेळी त्याला ढकललं गेलं आणि तो थेट खोल दरीत कोसळला.
Pune Crime News: होणाऱ्या पत्नीचा मदतीसाठी आरडाओरडा
केतन दरीत कोसळल्याचे पाहून त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी एकच आरडाओरडा केला. गडावरील इतर पर्यटकांनी आणि उपस्थितांनी या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना (Lonavala Rural Police) दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ (Shivdurg Rescue Team) आणि ‘मावळ वन्यजीव पथकाला’ (Mawal Wildlife Team) पाचारण केले. बचाव पथकाने दरीत उतरून शर्थीचे प्रयत्न करत केतनला बाहेर काढले. मात्र, दरीत कोसळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Pune Crime News: नोव्हेंबर महिन्यात होणार होते लग्न
विशेष म्हणजे, मृत केतन आणि त्या तरुणीचा विवाह निश्चित झाला होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढणार होते. ज्या मुलीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती, तिच्याच वाढदिवशी निसर्गाच्या सानिध्यात आनंद साजरा करायला गेलेल्या केतनवर काळाने घाला घातला. या धक्कादायक घटनेमुळे वाढदिवसाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात मोठ्या शोकाकुळ वातावरणात झाले. दरम्यान, लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती अशी माहिती मिळाली आहे.
तर एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story