Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनींच शेतकऱ्याला संपवलं आहे. संजय नागनाथ शिंदे वय 55 असं या शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी शेतात तलवारीने हल्ला करुन त्यांना संपवण्यात आलं. ही घटना कामती खुर्द परिसरात घडली आहे.
शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी शेतकऱ्याला संपवलं
सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द येथील संजय नागनाथ शिंदे (वय 55) हे आज 22 जून 2026 रोजी सकाळी दुचाकीने आपल्या शेतात गेले होते. तिथे शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये त्यांना जागीच ठार केले, असा आरोप मृताच्या मुलाने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
सुपारी देऊन भावानेच काढला सख्ख्या भावाचा काटा, भिवंडी हत्या प्रकरणाचा छडा, चार आरोपींना अटक
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या