भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले


संभाजीनगर : ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) खासदारांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना उबाठा पक्षातील आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीलाही 4 आमदारांची अनुपस्थिती असल्याने चर्चा रंगली. मात्र, चारही आमदारांनी आपल्या अनुपस्थितीची कारणे दिली आहेत. आजच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव हेही उपस्थित होते. मात्र, आजच शिवसेना सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांचा व्हिडिओ ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. भास्कर जाधव यांनी नार्वेकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही राजकीय वाद समोर आल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

भास्कर जाधव यांचा काल झालेला अपमान महाराष्ट्राने पाहिला, किती दिवस ते ठाकरेंसोबत राहतील माहीत नाही, कारण जाधव सहन करणार नाहीत, असे म्हणत भास्कर जाधव हेही लवकरच ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे संकेत संजय शिरसाट यांनी दिले आहेत. संभाजीनगर-जालना महायुती विधानपरिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी, विविध प्रश्नांना उत्तरे दिली. महायुती म्हणून लढलो, विजयी झालो, याचा आनंद आहे, असेही त्यांनी म्हटले. 

संजय राऊतांवर टीका

संजय राऊत यांचे नेहमीचे रटाळ विधान आहे, बालिश वक्तव्य करत असतो, महाराष्ट्र कधीही मुंबईपासून वेगळा होणार नाही, 25 वर्षात मुंबई महानगरपालिकेत यांनी काय केले? बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, शिवसेनेत एकच संजय राऊत राहिला आहे, लढाई मर्दसोबत होत असते, पक्ष कसे डुबवयाचे हे तुमचं काम आहे, असे म्हणत संजय राऊतांवर हल्लाबोल केला.जाळून टाकू, फोडू म्हणाले, याच्या वलगना आहे, याच्या वक्तव्याचे परिणाम पहायला मिळाले, याच्याकडे धमकी देणारे कोण आहे, आता सर्व खासदार जात आहेत. जनतेच्या मनात असलेले काम ओमराजे यांनी केले आहे, असेही शिरसाट यांनी म्हटले. 

महाविकास आघाडी एकत्र नाही

दरम्यान, प्रत्येक अधिवेशनात विरोधक पायऱ्यावर बसतात, त्याच मागण्या, त्याच आंदोलन, महायुतीने जे पाऊल उचलले त्यावर ते बोलणार नाहीत. महाविकास आघाडी एकत्र नाही, अधिवेशनात पाहायला मिळेल, असे म्हणत विधिमंडळ अधिवेशनावरुन विरोधकांच्या टीकेवर त्यांनी भाष्य केलं.

हेही वाचा

मोठी बातमी : 6 टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो, एकनाथ शिंदेंची फटकेबाजी





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *