मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या विधानसभेच्या आणि विधानपरिषदेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय देरकर, संजय पोतनीस, राहुल पाटील आणि सुनील शिंदे अनुपस्थित होते. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संबोधित केलं. ठाकरेंच्या सेनेचे परभणीतील आमदार राहुल पाटील या बैठकीला उपस्थित नसल्यासंदर्भातील कारण सांगितलं. आज विधानपरिषदेच्या मतमोजणीचा दिवस होता, आमचे उमेदवार उभे केले होते, त्यामुळं इथं थांबलो होतो, आम्हाला आमचा उमेदवार विजयी होईल, अशी अपेक्षा होती, असं राहुल पाटील म्हणाले.
Rahul Patil : राहुल पाटील काय म्हणाले?
निवडणुकीत जय पराजय होत असतो, चांगली मतं आम्ही घेतली आहेत. आमच्याकडे 45 मतं असताना आम्हाला 169 मतं मिळाली आहेत. उद्धव ठाकरे शनिवारी परभणीमध्ये येत आहेत, रविवारी शिवसेनेचा मेळावा असल्यानं तयारीसाठी थांबलो होतो, मी उद्या येणार आहे, कोणीही गैरसमज करुन घेऊ नये, आमदार राहुल पाटील यांनी म्हटलं. मतमोजणी असल्यानं आज येऊ शकत नाही, असं पक्ष कार्यालयात सांगितलं होतं, असं पाटील म्हणाले.
17 जागांपैकी परभणीची जागा चुरशीची होती, आमचे नगरसेवक जिगरीनं लढले होते, त्यामुळं परभणीत थांबलो होतो, असं राहुल पाटील यांनी म्हटलं. सहा खासदारांनी बंडखोरी केली नसून ती गद्दारी आहे. आमदारांबाबत केला जाणारा चुकीचा आहे, असं राहुल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. खासदार विकासासाठी निवडून गेले असं सांगतात, त्यांना विकासासाठी मतदान झालं होतं का? यांना कशासाठी मतदान दिलं होतं? यांनी कोणाच्या जीवावर मतदान मागितलं होतं. सत्तेत गेल्यावर विकास होतो का? विरोधात राहिल्यावर विकास होत नाही का? शेवटी महाराष्ट्र आणि देश एकसंघ आहे, विकास सगळीकडे झाला पाहिजे, असं राहुल पाटील यांनी म्हटलं.
18 -18 लाख मतदारांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का हा? त्यांना सोडून दुसऱ्या विचारधारेकडे किंवा दुसरीकडे जाता हा त्यांचा अपमान नाही का? आज 18 लाख लोक मतदान करतात तुम्हाला निवडून देतात आणि त्यानंतर तुम्ही अशी भूमिका घेता. तुम्ही स्वार्थासाठी भूमिका घेत आहात. मतदारांची या गोष्टी करण्यासाठी परवानगी आहे का असा सवाल राहुल पाटील यांनी केला.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story