Rovman Powell News : 6, 6, 6, 6, 6 अन् OUT! ‘त्या’ 5 वादळी षटकांनंतर… एका चुकीने सगळाच खेळ पलटला! 6व्या बॉलवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO


Rovman Powell 5 Sixes In Dasun Shanaka Over In Major Cricket League : क्रिकेटच्या मैदानावर एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकणे ही अत्यंत दुर्मिळ आणि कठीण गोष्ट मानली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमी फलंदाजांना हा पराक्रम करता आला आहे. नुकत्याच सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज कर्णधार रोव्हमन पॉवेल याने असाच एक थरारक प्रयत्न केला. सिएटल ओर्कास आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात पॉवेलने सलग 5 चेंडूंवर 5 गगनचुंबी षटकार ठोकले, पण शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि 6 षटकारांचा विश्वविक्रम अवघ्या काही मीटरने हुकला.

नेमकं काय घडलं 17 व्या ओव्हरमध्ये? (Rovman Powell 5 Sixes In Dasun Shanaka Over)

लॉस एंजेलिस नाईट रायडर्सकडून खेळताना पॉवेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 16 ओव्हर्सनंतर नाईट रायडर्सची धावसंख्या 138 धावा होती. पण 17 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या दसुन शनाका याच्यावर पॉवेलने पहिल्या चेंडूपासूनच हल्ला चढवला आणि सलग पाच चेंडूवर पाच षटकार ठोकले.

सलग 5 षटकार मारल्यानंतर स्टेडियममधील चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सर्वांनाच युवराज सिंगच्या ऐतिहासिक विक्रमाची आठवण झाली. शेवटच्या चेंडूवरही पॉवेलने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटचा कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनवरील क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. पॉवेल फक्त 11 चेंडूंमध्ये 37 धावा करून बाद झाला, ज्यामध्ये 1 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 336.36 इतका होता.

पॉवेल खास यादीत सामील

जरी 6 षटकारांचा विक्रम हुकला असला, तरी टी-20 क्रिकेटमध्ये सलग 5 चेंडूंवर 5 षटकार ठोकणारा पॉवेल हा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर, गुस्ताव मॅकिओन आणि आकिब इक्बाल यांनी असा पराक्रम केला आहे. दरम्यान, टी-20 मध्ये 6 चेंडूंत 6 षटकार मारण्याचा विक्रम भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा कीरॉन पोलार्ड आणि नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी (दोनदा) यांच्या नावावर आहे. पॉवेलच्या या वादळी खेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे ही वाचा –

Mumbai Indians Trade IPL 2027 : गुप्त बैठका अन् एका मोठ्या ट्रेडचा प्लॅन… IPL 2027 पूर्वी मुंबईच्या गोटात नेमकं शिजतंय काय?, रोहित शर्माला मिळणार नवा पार्टनर?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *