Cucumber Buying Tips : काकडी कडू आहे की नाही ? विकत घेण्याआधीच कसं ओळखाल?, वापरा ही छोटीशी युक्ती, पैसे जाणार नाहीत वाया – Marathi News | Cucumber Buying Guide: How to Pick Fresh, Sweet Cucumbers and Avoid Bitter Ones


काकडी विकत घेण्यापूर्वी हे नक्की तपासा

उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे काकडी. कोशिंबीर, रायते किंवा सलॅडमधून, लोकं विविध प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट करतात. काकडी शरीराला थंडावा देते, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने, ती उष्माघातापासून (heat stroke) उत्तम संरक्षण करते. मात्र, कधीकधी बाजारातून विकत आणलेल्या काकड्या कडू निघतात, ज्यामुळे पदार्थाची एकूण चव बिघडते.

त्यामुळे, काकडी न चाखताही ती ताजी, गोड आहे की कडू आहे, हे ओळखणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच, काकडी खरेदी करण्यापूर्वी ती कडू आहे की नाही, हे तपासण्याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काकडी कडू आहे की नाही , कसे तपासाल ?

1) रंगावरून काकडी ओळखा – ताजी आणि गोड काकडी फिकट हिरव्या रंगाची व चमकदार असते. जर काकडी खूप पिवळसर किंवा पांढरट दिसत असेल, तर ती जुनी किंवा कडू असू शकते.

2) काकडीच्या सालीवरील स्पष्ट आणि लांब रेषा तपासा – चांगल्या काकडीचे साल गुळगुळीत आणि गडद हिरव्या रंगाचे असते व त्यावर स्पष्ट रेषा दिसतात. जर या रेषा स्पष्ट दिसत नसतील किंवा साल कडक आणि त्यावर डाग असतील, तर ती काकडी कडू असू शकते.

3) काकडी हलक्या हाताने दाबून पहा – विकत घेताना काकडी हलक्या हाताने दाबून पहा. जर ती थोडी मऊ लागत असेल, तर ती ताजी मानली जाते. मात्र, ती खूप कडक किंवा खूप मऊ असेल, तर ती अतिपिकलेली किंवा खराब झालेली असू शकते, ज्यामुळे तिची चव कडू लागू शकते.

4) आकार आणि जाडीकडे पहा – खूप मोठ्या किंवा खूप लहान काकड्या अनेकदा आतून कडू असू शकतात. त्यामुळे मध्यम आकाराच्या, सरळ आणि बारीक काकड्या निवडणे नेहमीच उत्तम.

5) देठ तपासा – काकडीचा वेलीला जोडलेला भाग, म्हणजेच देठ, ताजा आणि हिरवा असावा. जर तो देठ सुकलेले किंवा खराब झालेलं दिसत असेल, तर ती काकडी जून झाल्याचे आणि तिची चव कडू असू शकते याचं लक्षण आहेय

काकडी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

1) शरीराला थंडावा आणि हायड्रेशन (पाणी पुरवठा) देते – काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. ती खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यापासून (डिहायड्रेशनपासून) बचाव होतो.

2) वजन कमी करण्यास मदत – काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ती खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

3) त्वचेला तजेलदार बनवते – काकडी शरीराला आतून हायड्रेटेड (पाणीयुक्त) ठेवण्यास मदत करते. नियमितपणे काकडी खाल्ल्याने त्वचेची नैसर्गिक चमक आणि ताजेपणा टिकून राहतो.

4) पचनक्रिया सुधारते – काकडीमध्ये फायबर असते, जे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. तसेच, बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठीही ती उपयुक्त मानली जाते.

5) शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत – काकडी शरीरातील विषारी घटक (toxins) बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी राहते. काकडीतील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करू शकते.

6) निर्जलीकरणापासून (dehydration) आराम – उन्हाळ्यात अति प्रमाणात घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी (dehydration) होऊ शकते .अशा वेळी काकडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे पाणी मिळते आणि हायड्रेशन टिकून राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *