Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीने सगळे रेकॉर्ड्स मोडले; इतिहासात पहिल्यांदाच घडलं, ध्रुव राठीलाही ओव्हरटेक


Cockroach Janta Party: देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांनी सुरुवातीला याला गंमत समजलं, पण काही दिवसांतच हा विषय सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. 

गेल्या 15 मे रोजी स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला असून फक्त आठ दिवसांत कॉकरोच जनता पार्टीचे एक कोटी 18 लाख 70 हजार फॉलोअर्स झाले आहेत. समाज माध्यमाच्या इतिहासात इतक्या कमी वेळात एखाद्या चळवळीने फॉलोअर्सचा मिळवलेला हा सर्वाधिक आकडा आहे. 

कॉकरोच जनता पार्टीने ध्रुव राठीलाही केलं ओव्हरटेक- (Cockroach Janta Party)

देशातील सर्वात अधिक लोकप्रिय असलेला ब्लॉगर ध्रुव राठी यालाही कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या बाबतीत ओव्हरटेक केलं आहे. केवळ 144 तासांत कॉकरोच जनता पार्टीने 18.5 मिलियन सबस्क्राईबर मिळवले आहेत व हा एक इतिहास आहे. दरम्यान,  छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक मराठी, कोण आहेत अभिजीत दीपके? (Who Is Abhijeet Dipke)

दरम्यान, या पक्षाचे संस्थापक अभिजीत भगवानराव दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील रहिवासी आहेत. 30 वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकॉस्ट जर्नलिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम करत असून, राजकीय नॅरेटिव्ह तयार करणे, सार्वजनिक संवाद आणि डिजिटल माध्यमांद्वारे मतप्रवाह घडवणे यावर त्यांचा अभ्यास केंद्रित आहे. अभिजीत दीपके यांनी 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. विशेषतः 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी मीम्सआधारित डिजिटल प्रचारावर काम केले. भाजपच्या ‘देश के गद्दारों को गोली मारो सालों को’ या घोषणेवर प्रत्युत्तर म्हणून ‘देश के गवारों को, स्कूल भेजो सारों को’ हे सोशल मीडिया कॅम्पेन राबवण्यात आले होते. त्या मोहिमेतही अभिजीत यांचा सहभाग होता.

कॉकरोच जनता पार्टीवरुन राजकारण, VIDEO:

संबंधित बातमी:

Cockroach Janta Party Who Is Abhijeet Dipke: मराठी मुलाने सुरु केलेली कॉकरोच जनता पार्टी काय आहे?; फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही; अभिजीत दीपकेचे आई-वडील काय काय म्हणाले?, संजय राऊत, संजय सिंग यांचंही नाव घेतलं!

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *