Supriya Sule Dance Viral Video: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) (Sharad Pawar) सर्वेसर्वा यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची लेक रेवती सुळेचा विवाहसोहळा अगदी थाटात पार पडला. शनिवारी दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. सारंग लखानीसोबत तिनं साताजन्माची गाठ बांधली. माहितीनुसार, रेवती आणि सारंगचा विवाहसोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये पार पडला. या लग्नात किंग खान शाहरुखचीही एन्ट्री पाहायला मिळाली. शाहरुख खानने आयकॉनिक स्टेप सादर करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांचाही हटके अंदाज पाहायला मिळाला. नेहमी राजकीय मैदानात सक्रीय असणारे सुप्रिया सुळे यांनी लेकीच्या लग्नात मनसोक्त आनंद लुटला. त्यांचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला. सध्या सुप्रिया सुळे यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे हिचा विवाह सोहळा शनिवारी पार पडला. लग्नाआधी संगीत सोहळा झाला. या सोहळ्यात सुळे आणि पवार कुटुंबियांचा राजकीय पलिकडील हटके अंदाज पाहायला मिळाला. सुप्रिया सुळेंनी आपल्या लेकीच्या लग्नात जबरदस्त डान्स केला. कुटुंबातील महिला सदस्य आणि मैत्रिणींसोबत त्यांनी जबरदस्त डान्स केला. यावेळी त्यांनी ‘लंडन ठुमकदा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. .याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सुप्रिया सुळेंचा लेकीच्या लग्नात हटके अंदाज (Supriya Sule Dance Viral Video)
व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो, की सुरुवातीला काही महिला स्टेजवर परफॉर्म करत असतात. यानंतर सुप्रिया सुळे या धावत स्टेजवर येतात. तसेच स्टेजवरील महिलांसोबत कंगना रणौतच्या ‘क्वीन’ सिनेमातील ‘लंडन ठुमकदा’ या गाण्यावर डान्स करतात. यावेळी सुप्रिया सुळेंनी पोपटी रंगाची साडी नेसली होती. पोपटी रंगाच्या साडीमध्ये सुप्रिया सुळे सुरेख दिसत होत्या. त्यांचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. लेकीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं.
या संगीतमय सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. राज्यातील नेते मंडळी, सेलिब्रिटी आणि उद्योगपती उपस्थित होते. नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक ब़ड्या नेत्यांनी रेवती सुळेच्या लग्नात हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के शिवकुमार, जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष