India Qualification Scenarios T20WC 2026 : एक पराभव अन् सगळंच बदललं! टीम इंडिया करो या मरोच्या चक्रव्यूहात; समीकरणांचा असा खेळ तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाकिस्तानची लवकरच EXIT


How Can India Qualify For Semifinals After Defeat to South Africa : महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रविवारी (21 जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच्या सेमीफायनलच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच पराभव असला, तरी ग्रुप ‘ए’ मधील वाढत्या स्पर्धेमुळे उपांत्य फेरीची शर्यत रंजक आणि कठीण झाली आहे. ऑस्ट्रेलियाने तीनपैकी तीन सामने जिंकून ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने तीनपैकी दोन सामने जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेनेही प्रत्येकी तीन सामने खेळले असून प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. पाकिस्तान आणि नेदरलँड्स उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.  

भारतासाठी सेमीफायनलचे गणित काय? (How Can India Qualify For Women’s T20 World Cup)

भारतीय संघाचे अजून 2 सामने बाकी आहेत. जर भारताने हे दोन्ही सामने जिंकले, तर संघ थेट सेमीफायनल गाठू शकतो. मात्र, नेट रनरेटच्या गणितापासून वाचण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपले आगामी सामने गमावणे किंवा दक्षिण आफ्रिकेचा एका सामन्यात पराभव होणे गरजेचे आहे. जर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी आपले उर्वरित सामने जिंकले, तर दोघांचेही प्रत्येकी 8 गुण होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया देखील 8 गुणांवरच अडकू शकतो. अशा स्थितीत अव्वल दोन संघ ठरवण्यासाठी नेट रनरेट (NRR) अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

भारतासमोरील आव्हाने (India Qualify For Women’s T20 World Cup)

भारताचे आगामी सामने बांगलादेश आणि तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. ऑस्ट्रेलियाला हरवणे हे भारतासाठी मोठे आव्हान असणार आहे. याउलट, दक्षिण आफ्रिकेचे आगामी सामने नेदरलँड्स आणि बांगलादेशविरुद्ध आहेत, जे कागदावर तरी सोपे वाटतात. तसेच बांगलादेशलाही कमी लेखून चालणार नाही. बांगलादेशला सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल. जर त्यांनी एका संघाला जरी हरवले, तरी 6 गुणांसह आणि चांगल्या रनरेटच्या जोरावर ते उलटफेर करू शकतात. त्यामुळे, भारतीय महिला संघाला सेमीफायनलचे तिकीट पक्के करण्यासाठी केवळ सामने जिंकणे पुरेसे नाही, तर आपला रनरेटही उत्तम ठेवावा लागेल.

पाकिस्तानची लवकरच EXIT (Pakistan Women’s T20 World Cup )

दुसरीकडे, पाकिस्तानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आणि संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, बांगलादेशने आपला दुसरा विजय मिळवून गुणतालिकेतील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. हा संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एकाच हंगामात दोन सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

हे ही वाचा –

IND vs ENG ODI Squad : 12 खेळाडूंवर विश्वास, 3 जणांचा पत्ता कट, घातक बॉलरची 3 वर्षांनंतर एन्ट्री; इंग्लंडला धडकी भरली, BCCIचे हैराण करणारे निर्णय



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *