Maharashtra Rain Updates: मुंबईत आज पावसाने दमदार हजेरी (Mumbai Rain Updates) लावली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. तर मध्य मुंबईतही सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वरळी, लोअर परळ, अंधेरी, विलेपार्ले, दादर आणि वांद्रे परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. तर नवी मुंबई, ठाण्यामध्येही रिमझिम पाऊस पडतोय. दरवर्षी साधारण 7 जूननंतर राज्यभरात पावसाला सुरुवात होत असते. मात्र, यंदा एल निनोचं संकट असल्यानं तब्बल 15 ते 17 दिवस मान्सून लांबला. तरी आज पावसाला सुरुवात झाल्यानं मात्र सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. (Maharashtra Weather Updates)
मुंबईला आज ऑरेंज अलर्ट, पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट- (Mumbai Rain Updates)
आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस मुंबई शहराला वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. तसेच हवामान प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकणार असल्याने 24 ते 26 जून या कालावधीत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची दाट शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांपासून मान्सूनच्या रेंगाळलेला मान्सून आज, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत काहीसा पुन्हा सक्रिय झाला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
कोकणातही मान्सूनने जोर पकडला- (Konkan Rain Updates)
सिंधुदुर्गात मान्सून दाखल झाल्यानंतर गेले 15 दिवस दडी मारलेल्या पावसाने काल कणकवली आणि कुडाळमधील काही भागात हजेरी लावली. कणकवली आणि कुडाळ मधील काही भागात 15 ते 20 मिनिट पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भाताची रोप कोमेजू लागली होती, त्याला या पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने काही प्रमाणात पाणी मिळाले आहे. मात्र जिल्ह्यातील इतर भागातील शेतकरी पावसाची चातका सारखा प्रतीक्षा करत आहे.
हिंगोलीत अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस- (Hingoli Rain Updates)
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज वसमत शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे दिवसभर उखाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकऱ्यांना अजूनही पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा कायम आहे मेघराजाने अजून शेतकऱ्यांची परीक्षा न पाहता जोरदार पद्धतीने बरसावे आणि लवकर पेरण्या पूर्ण व्हाव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
संबंधित बातमी:
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?