त्यांच्या DNA मध्ये गडबड, हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा उभा राहा, फुटलेल्या खासदारांवर राऊतांचा प्रहार 


Sanjay Raut :  मराठी माणसांशी बेईमानी करणाऱ्यांना, दिसेल तिथे आणि हातात जे असेल त्याने हाना असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी फुटलेल्या खासदारांना इशारा दिला. शिवसेनेने रक्ताचं पाणी केलं, तुम्हाला गटारातून गंगेत नेल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळं तुम्ही आमदार खासदारा झालात असे राऊत म्हणाले. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आला आहेत. मशालीचे मते ही उद्धव ठाकरेंना ओरीजनल शिवसेनेला पडली आहेत. ती मत भाजपच्या आणि मिंधेच्या विरोधात पडली आहेत. तुम्ही लाखो मतदारांचा अपमान बेईमानी केली आहे. तुम्ही राजीनामा द्या आणि जिकडं जायचं तिकडं जा असे राऊत म्हणाले. हिंमत असेल तर पुन्हा उभा राहा आणि जिंकून दाखवा, शिवसैनिक तुम्हाला आडवा करुन दाखवल्याशिवाय राहणार नाही असे राऊत म्हणाले.

पक्ष संकटात आला तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही पळून गेलात, संजय दिना पाटील यांच्यावर टीका

शिवसैनिकांनी प्रमे दिलं, आदर, सन्मान दिला. तुमच्या मुलीला नगसरेवक केलं, तुम्हाला खासदार केलं, मान सन्मान दिला. पण जेव्हा पक्ष संकटात आला तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही पळून गेलात. याची इतिहासात नोंद राहील, तुम्ही गद्दार आणि बेईमान म्हणूनच राहाल असी टीका संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर केली. उद्धवसाहेब ही आपली चूक नाही. तुम्ही मोठ्या मनाने त्यांना आमदार केलं खासदार केलं, पण त्यांच्या डीएनए मध्ये गडबड आहे. म्हणून ते गंगेतून गटारात गेल्याची जहरी टीका राऊतांनी केली. 

तुम्ही लांडग्यांच्या कळपात गेला आहात

ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. लक्षात घ्या तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणातय म्हणजे आम्ही टायगर आहोत. तुम्ही लांडग्यांच्या कळपात गेला आहात. आमचं ऑपरेशन तुडवा सुरु झालं आहे असा इशारा संजय राऊतांनी दिला. वाय प्लस सिक्युरेटी घ्यायची तेवढी घ्या तुम्ही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्हाला कळेल शिवसेनेचा राडा काय असतो. या भांडुपमध्ये त्यांना गाडा आणि गद्दारीचा सूड घ्या आणि हा सूड घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उद्धवजी मी तुम्हाला सांगतो, इथला पुढला खासदार शिवसेनेचा मशालीचा असेल असे राऊत म्हणाले. ज्यांनी मराठी माणसाशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्राशी हेईमानी केली तो आयुष्य्ता कधीही सुखानं जगू शकणार नाही असे राऊत म्हणाले. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *