कांतारा फेम अभिनेत्री Rukmini Vasanth डीपफेक बिकनी व्हिडीओ, तीन आरोपींना सायबर क्राईमने उचलले.. – Marathi News | ‘Kantara’ fame actress Rukmini Vasanth’s deepfake bikini video: Cyber ​​Crime unit detains three accused.


Rukmini Vasanth Deepfake Video Case: गेल्या काही दिवसात एआयने जग व्यापले आहे. मात्र, एआयच्या डीप फेक तंत्राचा धोका एव्हाना सर्वांना कळलेला आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तीचे डीपफेक तंत्राने अगदी हुबेहुब नकली व्हिडीओ तयार केले जात आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन केले जाते. आणि त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो. आता साऊथ चित्रपट कांतारा अभिनेत्री रुक्मिणी वसंत हीचा एक बिकनी घातलेला डीपफेक व्हिडीओ व्हायरल होता. आता या प्रकरणात कारवाई करीत तिघा जणांना अटक केली आहे. साऊथ आणि बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीचे डीप फेक व्हिडीओ तयार केले जात आहेत. त्यामुळे प्रायव्हसीला तसेच स्वातंत्र्याला धक्का बसला आहे.

२९ वर्षीय अभिनेत्री रुक्मिणी वसंत हीने सायबर क्राईमने तिच्या डीपफेक व्हिडीओच्या विरोधात सायबर क्राईममध्ये तक्रार केली होती. अभिनेत्रीने एआयने तयार केलेला तिचा बिकनीवरील फोटो आणि डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे रुक्मिणी वसंत हिच्या प्रतिमेला धक्का बसत होता. यामुळे तिने बंगलुरु येथील सायबर क्राईममध्ये या संदर्भात तक्रार केली आहे.

या संदर्भात सायबर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात तीन आरोपींना अटक करुन न्यायदंडाधिकाऱ्या समोर हजर केल्यानंतर कस्ठडीत पाठवण्यात आले आहे. याशिवाय पोलिस आणखी पुढे जाऊ तपास करीत यात आणखीन कोणी अडकलेले आहेत का याचा तपास करत आहे. अनेक अभिनेत्री आणि सुपर स्टारनी एआय जनरेटेड व्हिडीओच्या विरोधात तक्रार केल्या आहेत.

ब्लॉकबस्टर फिल्मने कमावले नाव

रुक्मिणी वसंत हीने साल २०२५ मध्ये ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ मध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्यांचा रोल मिस्टीरियस टाईपचा होता. या चित्रपटाने रुक्मिणी बसंत रातोरात सोशल मीडियाची सेन्सेशन बनली. कांतारा चॅप्टर १ ही साल २०२५ ची टॉप – ३ ब्लॉकबस्टर चित्रपटात सामील होती. तिचे कलेक्शन ८०० कोटी रुपयांहून जास्त झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *