Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत


Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 वांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली. दांबुला येथे प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून ३७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंका ‘अ’ संघ 47.1षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या विजयाचा नायक 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी होता. त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 11 षटकार आणि 6 चौकारांसह 94 धावा ठोकल्या. वैभवने अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून 50 षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. कर्णधार तिलक वर्माने 67, प्रियांश आर्याने 39 आणि अनुकूल रॉयने 15 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या.

378 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका ‘अ’ संघाची सुरुवात खराब झाली. वनुजा साहनने संघासाठी सर्वाधिक 62 धावा केल्या. सदिरा समरविक्रमानेही 52 धावांचे योगदान दिले. यश ठाकूर आणि विप्रज निगम यांनी इंडिया ‘अ’ संघाकडून प्रत्येकी 3 बळी घेतले.

वैभवने 20 वर्षे जुना विक्रम मोडला

वैभवच्या आधी, 50 षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक श्रीलंकेच्या कौशल्या वीरारत्नेच्या नावावर होते. त्याने 2006 मध्ये रागामा क्रिकेट क्लबकडून खेळताना 12 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. वरिष्ठ स्तरावर, 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे सामने असतात: लिस्ट ‘अ’ आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय. प्रत्येक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना हा स्वतःच एक लिस्ट ‘अ’ सामना असतो.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम एबी डिव्हिलियर्स आणि मॅथ्यू फोर्ड यांच्या नावावर आहे. या दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी 16 चेंडूंमध्ये आपली अर्धशतके पूर्ण केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 18 जानेवारी 2015 रोजी जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्यावेळी त्याने 44 चेंडूंमध्ये 149 धावा केल्या होत्या. 23 मे 2025 रोजी, वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डने डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावून डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली.

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *