Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: शिवसेना ठाकरे गटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खिंडार पाडत सहा खासदार फोडले आहेत. या फुटीवरून ठाकरे गटाची ताकद पूर्णपणे विभागली असल्याची चर्चा असतानाच आता ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांचे राईट हँड समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्यात आलबेल नसल्याचे समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांच्यावर चिडचिड करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आता हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
भास्कर जाधव आजकालखूप चिडतात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव आजकाल खूप चिडतात ते मिलिंद नार्वेकर यांच्यावर चिडलेत. भास्करराव अलीकडील काळात खूप रागवतात. मिलिंद नार्वेकर यांनी दोन-चार वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावांनी त्यांचेच ऑपरेशन तुडवातुडव करून टाकले. भास्कर जाधव यांनी टक्केवारी किंवा कमिशन संदर्भात केलेल्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्याकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. अलीकडच्या काळात भास्कर जाधव यांचा ‘भास’ वाढलेला आहे. त्यांना वेगवेगळे भास व्हायला लागलेले आहेत, त्यातूनच कदाचित हा भास त्यांना झाला असावा. सरकार पूर्णपणे पारदर्शक काम करत असून, कोणालाही मंत्रालयात येण्याची गरज पडत नाही, पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे हवेत तीर मारून केलेल्या आरोपांनी जनतेचा विश्वास मिळत नाही, असे फडणवीस म्हणाले.
आता राहिलाच कोणता राजीनामा? ती वेळ का आली?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देऊन सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवायला तयार आहे, असे म्हटल्याचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं हे आहे. आता राहिलाच कोणता राजीनामा? ती वेळ का आली? फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेना म्हणजे काय हा पक्ष नाही, तर तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही तर विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला, त्या क्षणी विचार मान्य असणारे सगळे वेगळे झाले. ज्यावेळी आत्मचिंतन करण्याची गरज होती, त्यावेळी उद्धवजींनी आत्मचिंतन केले नाही, हा त्याचा परिणाम आहे. बाळासाहेबांची शिवसेना आता एकनाथराव शिंदे चालवत आहेत आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण व विचार त्यांच्याच सोबत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?