नवी दिल्ली : भारतात खासगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठराविक रक्कम ईपीएफओकडे दरमहा जमा केली जाते. पीएफ खात्यातील जमा रकमेचा वापर अनेक जण मोठा प्रकल्पावेळी किंवा आपत्कालीन स्थितीत करतात. पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ईपीएफओकडून EPFO 3.0 प्रणाली लाँच केली जाणार आहे. या नव्या प्रणालीत पीएफ खातेदारांना अधिक फायदे होणार असल्याचं सांगितलं जातं.
EPFO : पीएफ खात्यातून किती रक्कम काढता येणार?
पीएफ खात्यातून किती पैसे काढता येणार यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. ईपीएफओकडून 15 ऑक्टोबर 2025 ला जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार पात्र सदस्य पीएफ खात्यातील शिल्लक रकमेच्या 75 टक्के रक्कम कोणतीही कागदपत्रं अपलोड केल्याशिवाय काढू शकतात. याशिवाय काही कारणांसाठी पीएफ खात्यातील 100 टक्के रक्कम देखील काढता येऊ शकते. मात्र, काही जणांमध्ये पीएफ खात्यातील 100 टक्के काढता येणार की नाही यासंदर्भातील प्रश्न निर्माण झाले होते.
कोणतीही कागदपत्रं अपलोड केल्याशिवाय पीएफ खात्यातून 75 टक्के रक्कम काढता येते. मात्र, विशेष परिस्थितीत काही कारणांमुळं पीएफ खात्यातील 100 टक्के रक्कम काढता येऊ शकते. पीएफ खातेदाराला त्यासाठी योग्य कारण द्यावं लागेल. अनेकदा चुकीचं कारण देऊन क्लेम दाखल केल्यास ईपीएफओकडून तो नाकारला जाऊ शकतो.
कंपनी किंवा संस्था 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असल्यास आणि कर्मचाऱ्याला कोणत्याही मोबदल्याशिवाय बेरोजगार व्हावं लागल्यास किंवा दोन महिन्यांपेक्षा अधिका कालावधीसाठी पगार न मिळाल्यास पूर्ण पीएफ काढता येऊ शकतो. कोर्टात नोकरीवरुन काढल्याच्या प्रकरणात तक्रार किंवा आव्हान दिलं असल्यास, संस्था 6 महिन्यांपेक्षा अधिका काळ बंद असल्यानं कर्मचारी बेरोजगार झाल्यास, स्वत:वरील उपचार किंवा कुटंबातील सदस्याच्या उपचारासाठी पीएफ खात्यातून 100 टक्के रक्कम काढता येऊ शकते.
नव्या नियमांनुसार, पीएफ खात्यातून 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. मात्र, या संदर्भातील अधिकृत नियम EPFO 3.0 लाँच झाल्यावरच समजू शकतात.
दरम्यान, पीएफ खात्यातील रक्कम यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा देखील लवकरच सुरु होणार आहे. पीएफ खात्यात शिल्लक रकमेपैकी 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे एटीएमवरुन काढता येऊ शकते. मात्र, त्यासाठी ईपीएफओकडून विविध नियम लावले जाऊ शकतात.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!