आपचे राज्यसभेचे खासदार पळवल्याने सुरु झालेले देशातील भाजपाचे पक्ष फोडण्याचे कारस्थान अखेर पुन्हा महाराष्ट्रात येऊन थांबले आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेची चार वर्षांपूर्वी उभी शकले केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे ९ पैकी ६ खासदार फोडण्याचे ऑपरेशन टायगर घडले आहे. या ६ खासदारांनी अजून आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यावर सस्पेन्स कायम असताना आता शिवसेना नेते संजय राऊत यांची आज टीव्ही ९ मराठीने मुलाखत घेतली. भाजपाने देशात अनेक पक्ष फोडायला सुरुवात केली आहे,ते जी ही टीम प्रचंड पैसा ओतून ईडी आणि सीबीआयच्या भीती दाखवत तयार करत आहेत, ती अमित शाह यांची टीम आहे, पंतप्रधान मोदी असताना त्यांना पंतप्रधान व्हायची इतकी घाई का लागली आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.