शिंदे सेना की ठाकरे गट? ओमराजे करणार घोषणा, धाराशीवमध्ये पोलीस अन् कार्यकर्त्यांची फौज, नेमकं काय घडतंय? – Marathi News | Omraje nimbalkar reach to dharashiv soon meeting with shiv sena karyakarta when will declare will have to join shivsena or not


Omraje Nimbalkar : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार फुटलेले आहेत, असे सांगितले जात होते. आता मात्र या सहा खासदारांमधील एक असलेले ओमराजे निंबाळकर यांनी मात्र सध्या वेगळीच भूमिका घेतली आहे. अगोदर बंडखोरी करण्याच्या मानसिकतेत असलेले ओमराजे सध्या मात्र मी विचार करून, कार्यकर्त्यांशी बोलून शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे की नाही, हे ठरवणार आहे, असे जाहीर केले आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर आता वारं फिरलं असून ओमराजे यांना परत बोलवण्यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली केल्या जात आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही पूर्ण ताकद लावली असून ओमराजे यांनी निर्णय बदलू नये यासाठी प्रयत्न केले जातायत. दरम्यान, ओमराजे यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या धाराशीव या मतदारसंघातही मोठ्या हालचाली वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

धाराशीवमध्ये नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर हे धाराशीवमध्ये पोहोचले आहेत. धाराशीवमध्ये धाराशीवमध्ये पोहोचताच ते गोवर्धन वाडी येथील आपल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अगोदरच मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल झाले आहेत. गोवर्धनवाडी येथे पोहोचल्यानंतर ते कै. पवन राजे निंबाळकर यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक सुरू होणार आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी…

एकीकडे धाराशीवमध्ये ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांनी ओमराजे यांच्या घरासमोर येत घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर पोलीस बंदोबस्तात आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत.

ओमराजेंच्या समर्थनार्थ बॅनर

दुसरीकडे ओमराजे यांचा विचार बदलू नये यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण असल्याचे पाहायला मिळत आहे. बैठकीनंतर ठाकरेंसोबत राहायचं की शिंदे यांच्या पक्षात जायचं असा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे बैठकीमध्ये गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना अलर्ट मोडवर गेली आहे. कार्यकर्त्यांच्या हातात ओमराजेंच्या समर्थनार्थ बॅनर असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आता ओमराजे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *