भाऊ, भाऊ! जया बच्चन यांनी संजय राऊतांना मारली हाक; मराठीत बोलल्या, काय ते तुम्हीच ऐका | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Jaya Bachchan Speaking Marathi Video : मराठी भाषा बोलण्याच्या बाबतीतही जया बच्चनही मागे नाहीत. नुकताच त्यांचा मराठी बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18

बॉलिवूडचे शहंनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं हिंदी भाषेप्रमाणे मराठी भाषेवरील प्रेम सगळ्यांना माहितीच आहे. कित्येकदा ते मराठीत बोलताना दिसले आहेत. तसंच त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन ज्याने नुकतंच रितेश देशमुखच्या राजा शिवाजी फिल्ममध्ये काम केलं आणि त्याचाही मराठीतील डायलॉग ऐकायला मिळाला. पण तुम्ही जया बच्चन यांना मराठीत बोलताना पाहिलं का? मराठी भाषा बोलण्याच्या बाबतीतही जया बच्चनही मागे नाहीत. नुकताच त्यांचा मराठी बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जया बच्चन ज्यांचा जन्म एका बंगाली भाषिक कुटुंबात झाला. तर त्यांचे पती अमिताभ मूळचे यूपीचे, जे हिंदी भाषिकच. जया बच्चन यांनी हिंदी फिल्ममध्ये काम केलं आहे. पण इंग्रजी, बंगाली, हिंदीप्रमाणे त्या मराठी भाषा देखील उत्तम प्रकारे जाणतात आणि प्रसंगी त्याचा वापर करतात.

जया बच्चन यांनी सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळेच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. इथं बरेच नेते मंडळी आणि इतर सेलिब्रिटीही उपस्थित होते जे मराठी भाषिक आणि जया बच्चन यांनीही त्यांच्याशी मराठी भाषेतच संवाद साधला. जया बच्चन यांनी संजय राऊत यांना पाहिलं आणि त्यांना मराठीत हाक मारत, त्यांच्याशी मराठीत संवाद साधला आहे.

जया बच्चन अगदी अस्खलित मराठी बोलल्या आहेत. आता त्या मराठी कसं बोलल्या आणि काय बोलल्या हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता जया बच्चन येतात. समोर त्यांना ठाकरे कुटुंब दिसतं. ज्यांच्यासोबत संजय राऊत असतात. जया बच्चन संजय राऊतांना पाहताच भाऊ, भाऊ अशी हाक मारतात. पुढे त्या संजय राऊतांना विचारतात, ‘तुम्ही श्वेताला भेटलात का?’ यावर संजय राऊत ‘हो श्वेता मला भेटली’ असं सांगतात. यावर पुढे जया त्यांना ‘श्वेता तुमची खूप मोठी फॅन आहे, हे मराठीतच सांगतात.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *