Jaya Bachchan On Sanjay Raut : संजय राऊतांना पाहून जया बच्चन यांनी हाक मारली, मराठीत बोलल्या, ‘तुम्ही श्वेताला भेटलात का? ती तुमची फॅन आहे’


Jaya Bachchan Calls Sanjay Raut Bhau: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नातीचं काल अगदी थाटामाटात लग्न झालं.  खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिनं उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नात दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे नेते मंडळींसह सेलिब्रिटींच्या हजेरीमुळे या लग्नसोहळ्याला चारचांद लागले.  किंग खान शाहरुखने (Shahrukh Khan) या सोहळ्यात आपल्या हटक्या अंदाजाने मैफील रंगवली.  त्यांच्या लग्नसोहळ्यात शाहरुख खानसह  बिग बी अमिताभ बच्चन यांचीही हजेरी पाहायला मिळाली.   या खास सोहळ्यानिमित्त बिग बींनी सपत्नीक हजेरी लावली होती.  यावेळी खासदार संजय राऊत, मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि गौतम अदानीही उपस्थित होते.  दरम्यान, लग्नसोहळ्यात अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन आणि संजय राऊत यांच्यात एक मजेशीर किस्सा घडला. 

रेवती सुळेच्या लग्न सोहळ्यात जया बच्चन आणि संजय राऊत यांच्यात काय बोलणं झालं? (Jaya Bachchan Calls Sanjay Raut Bhau)

काल रेवती सुळेच्या लग्न समारंभात ठाकरे कुटुंबीय आणि बच्चन कुटुंबीय एकत्र  आले होते.  जया बच्चन आणि संजय राऊत यांच्यात भेट झाली. या लग्नसोहळ्यात जया बच्चन यांनी संजय राऊत यांना भाऊ भाऊ म्हणून हाक मारत मराठीत संवाद साधला.  जया बच्चन यांनी मराठीत संजय राऊत यांना, ‘तुम्ही श्वेताला भेटला ना’ असा प्रश्न विचारला. यावर संजय राऊत यांनी भेटल्याचे उत्तर दिले. 

त्यानंतर जया बच्चन या रश्मी ठाकरे यांना हसत बोलल्या की ‘श्वेता त्यांची खूप मोठी फॅन आहे’..यावर रश्मी ठाकरे यांनी खळखळून हसून दाद दिली. त्याचवेळी मागे उभे असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांनीही संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांच्याबद्दल कमेंट केली. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

रेवती सुळेच्या लग्नात शाहरुख खानचा जलवा

रेवती सुळे आणि सारंग लखानीच्या लग्नापूर्वीच्या संगीत सोहळ्यात किंग खान शाहरुख खानची उपस्थिती पाहायला मिळाली.  शाहरुख खानची डॅशिंग एन्ट्री पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यानं ‘कोइ मिल गया’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला.    तसेच आपली आयकॉनिक स्टेप देखील केली. शाहरुख खानचा रेवती सुळेच्या या सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘कांतारा’ फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, तिचे ‘नको ते’ व्हिडीओ अन् फोटो व्हायरल; पोलिसांकडे धाव घेताच 3 आरोपी अटकेत

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *