Hardik Pandya : पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाला मिळाला हार्दिक पंड्याचा उत्तराधिकारी, त्याच्यावर काम सुरु – Marathi News | India find Hardik Pandya successor for odi World Cup 2027 Nitish Kumar Reddy India assistant coach Ryan ten Doeschate comment


कुठल्याही टीमसाठी ऑलराऊंडर खेळाडू जमेची बाजू असतो. सध्या टीम इंडियाकडे हार्दिक पांड्याच्या रुपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहे. संघाला गरज असताना हार्दिकने नेहमीच आपली कामगिरी उंचावली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत हार्दिक समोरच्या टीमवर भारी पडतो. म्हणून तो टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे. पण हार्दिकचा फिटनेस हा कळीचा मुद्दा आहे. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल बीसीसीआय सुद्धा ठामपणे खात्री देऊ शकत नाही. फिटनेसच्या कारणामुळेच हार्दिकला T20 चं कर्णधारपद गमवाव लागलं. त्याच्याजागी सूर्यकुमार यादवची वर्णी लागली. बीसीसीआयने पुढच्यावर्षी होणार्‍या 2027 वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघाची बांधणी सुरु केली आहे. यात हार्दिकचा फिटनेस महत्वाचा मुद्दा राहणार आहे.

टी 20 चा फॉर्मेट वेगळा आहे. पण हार्दिक पंड्या वनडे क्रिकेटमध्ये 10 ओव्हर गोलंदाजी आणि 50 षटकं मैदानावर उभा राहण्यासाठी पूर्णपणे फिट आहे का? या बद्दल बीसीसीआयच्या मनातच शंका आहे. म्हणून 2027 वनडे वर्ल्ड कपचा विचार करता, हार्दिकला पर्याय कोण ठरु शकतो, याची चाचपणी सुरु झाली आहे. भारताचे सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांनी वनडेच्या दृष्टीने नितीश कुमार रेड्डीचं समर्थन केलं आहे. डोशेट यांच्या मते नितीश कुमार रेड्डी हार्दिक पंड्याचा नैसर्गिक उत्तराधिकारी असून तो ऑलराऊंडर म्हणून बॅकअप सुद्धा आहे. वनडे वर्ल्ड कपपर्यंत नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू कामगिरीचं विश्लेषण सुरु राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हार्दिक पंड्या का महत्वाचा?

रयान टेन डोशेट बीसीसीआय व्हिडिओवर बोलताना म्हणाले की, “भारत अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत चांगली प्रगती करत आहे. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या सुद्धा का महत्वाचा आहे, ते सुद्धा त्यांनी सांगितलं” “हे खरचं चांगलं आहे. माझ्या मते, बहुतांश खेळाडू बॉलिंग ऑलराऊंडर्स आहेत. पण हार्दिक पंड्या फिट असतो, तेव्हा तो संघामध्ये एक वेगळी गोष्ट घेऊन येतो. तो एक मजबूत फलंदाज आणि दमदार फिनिशर आहे. काही षटकं गोलंदाजी करण्याबरोबर असा फिनिशर मिळणं कठीण आहे” असं रयान टेन डोशेट म्हणाले.

हार्दिकचा उत्तराधिकारी तोच आहे

दुखापतीमुळे हार्दिक पंड्याला सध्या अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघात संतुलन साधण्यासाठी दुसऱ्या ऑलराऊंडरचा शोध घ्यावा लागत आहे. या शोधामुळेच नितीश कुमार रेड्डी चर्चेत आला आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत 23 वर्षीय नितीश कुमार रेड्डीची भूमिका महत्वाची बनते. “नितीश कुमारने त्याचं महत्व संघ व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिलय” असं रयान टेन डोशेट म्हणाले. ‘या संघासाठी आपण किती महत्वाचे आहोत हे नितीशने मागच्या 18 महिन्यात दाखवून दिलय’ असं डोशेट म्हणाले. ‘हार्दिक पंड्या नसताना त्याच्या जागी बॅक अप आणि त्याचा उत्तराधिकारी तोच आहे’ असं डोशेट यांचं मत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *