2026 Most Profitable Malyalam Film: 2026 वर्षाचे पहिले सहा महिने उलटलेत. या काळात बॉलिवूडपासून ते अगदी साऊथ सिनेमांपर्यंत अनेक सिनेमे रिलीज झाले. काही सिनेमांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे कमाई करता आली नाही. यात अनेक मोठ्या बजेटच्या सिनेमांचाही समावेश होता. बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांपेक्षा अगदी तुटपुंज्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या, साऊथ सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवल्याचं पाहायला मिळालं. अशातच जर तुम्हाला 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा कोणता? असं विचारलं तर, तुम्ही अगदी डोळे बंद करुन ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) सिनेमाचं नाव घ्याल. पण, हा तुमचा गैरसमज ठरेल. कारण 2026 मधील सर्वात प्रॉफिट कमावणारा सिनेमा ‘धुरंधर 2’ नाही, तर एक साऊथ सिनेमा आहे. या सिनेमानं तब्बल 2284 टक्क्यांचा नफा कमावलाय.
आम्ही ज्या साऊथ सिनेमाबाबत बोलतोय, तो मल्याळी सिनेमा ‘वाझा 2: बायोपिक ऑफ अ बिलियन ब्रदर्स’* (Vaazha II: Biopic of a Billion Bros) हा आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमानं धमाकेदार कामगिरी केलीय आणि बॉक्स ऑफिसवर केवळ इतर साऊथ सिनेमांनाच नाहीतर बॉलिवूड सिनेमांनाही काँटे की टक्कर दिलीय. ‘धुरंधर 2’ सारख्या बलाढ्य बॉलिवूड सिनेमाच्या लाटेतही या तुटपुंज्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमानं दमदार कमाई केलीय.
‘वाझा 2’चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड
‘वाझा 2’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या रेकॉर्डबाबत बोलायचं तर, कोईमोईच्या रिपोर्टनुसार, फिल्मनं देशासोबतच जगभरातही मोठी कमाई केलीय. फिल्मचं देशातील कलेक्शन 129.42 कोटी होतं. तर, देशांतर्गत कलेक्शनपेक्षा वर्ल्डवाइड कलेक्शन करण्यात आलंय. फिल्मनं वर्ल्डवाइड 238.46 कोटींचा व्यावसाय केलाय. ही एक लो बजेट मल्याळम फिल्म होती, जिनं धमाकेदार प्रॉफिट मिळवलाय.
‘वाझा 2’चा ‘धुंरधर 2’ पेक्षाही जास्त प्रॉफिट
‘वाझा 2’नं 238.46 कोटींची जगभरात धमाकेदार कमाई केलेली, तर IMDb च्या रिपोर्टनुसार, या मल्याळम फिल्मचं बजेट 10 कोटी होतं. फिल्मचा प्रॉफिट डोळे विस्फारणारा होता. सिनेमानं 2284.6 टक्क्यांचा प्रॉफिट कमावला होता. एवढा प्रॉफिट तर ‘धुरंधर 2’ 1800 कोटी कमावल्यानंतरही कमावू शकली नाही. आदित्य धरचा ‘धुरंधर 2 द रिवेंज’नं जवळपास 637 टक्क्यांचा प्रॉफिट कमावलाय, जो ‘वाझा 2’च्या तुलनेत खूपच कमी आहे.
मल्याळम सिनेमा ‘वाझा 2’ (Vaazha 2) ची कथा हाशीर, ॲलन, अजिन, विनायक या चार मित्रांच्या इमोशन्स आणि सस्पेंसनं भरलेली आहे. हा सिनेमा तरुणांच्या जडणघडणीवर आधारित असून, यात संघर्ष आणि विनोदाचा सुरेख संगम पाहायला मिळतो. या सिनेमाचं दिग्दर्शन साविन एस. ए. यांनी केलंय. या सिनेमाच्या ओटीटी (OTT) रिलीजबद्दल सांगायचं तर, तो गेल्या महिन्यात विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झालाय. हा सिनेमा ‘जिओ हॉटस्टार’ (Jio Hotstar) वर हिंदी आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष